नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
नांदेड :- पृ़थ्वीवरून थेट अवकाशातील चंद्र,मंगळ व चक्क सूर्याला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रचंड विलक्षण बुद्धीजीवी मानवास आजपर्यंतही त्याचा मृत्यू कधी❓कुठे❓ व कसा होईल याचा यत्किंचितही पूर्वाभास लागू शकलेला नाही.या वास्तविकतेची प्रचिती आज घडलेल्या एका अतिशय हृदयद्रावक आणि मनाला हेलावून टाकणार्या घटनेवरून आली आहे. किनवट तालुक्यातील राजगड येथील अमोल बळीराम राठोड (३३) यांचा विद्यूत तारेचा स्पर्श होऊन दुर्दैवी मृत्यू झाला.दोन दिवसांवर घरी बहिनीचे लग्न असल्यामुळे शेळ्यांना घरीच चारा-पाणी करण्याच्या उद्देशाने चारा आणण्यासाठी किनवट-सारखणी राष्ट्रीय महामार्गालगतच्या राजगड जंगलात गेला होता.सदरील दुर्घटना ही आज (९ मे) सकाळची होय.किनवट पोलीसांनी स्थळपंचनामा करून घटनेची आकस्मिक मृत्यु अशी नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, किनवट येथे हलविण्यात आल्याचे वृत्त आहे.
राजगड घाटात शेळ्यांना झाडांचा पाला घेत असतांना झाडावरुन गेलेल्या विद्यूत तारांचा स्पर्श झाल्याने राजगड येथील अमोल राठोड हा जागीच मृत्त पावला. अवघ्या दोनच दिवसांवर घरी बहिणीचे लग्न असल्यामुळे शेळ्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अमोल राजगड नजीकच्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या जंगलात झाडांची पाला आणण्यासाठी गेला होता. त्याच्या पश्चात पत्नी अनिता, मुलगा शाश्वत आणि मुलगी गार्गी हा परिवार आहे. घरचा कमावता अमोलचा मृत्यू झाल्याने पत्नीवर कुटूंबाची जबाबदारी ओढावली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.गरीब कुटूंबास विद्यूत वितरण कम्पनीसह शासनाच्या आपत्ति व्यवस्थापन विभागाकडून मदतीचा हात पुढे करण्याची मागणी मृतकाच्या कुटुंबीयांसह गावातील नागरिकांनी केली आहे.