शेतकऱ्यांच्या हाताला आलेले भुईमुगाचे पिकाचे अतोनात नुकसान…
नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे
नांदेड – नायगाव तालुक्यातील कुंटूर मंडळातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपले असून यात वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. एन शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेले पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. शेतकरी पहिलेच हवालदिन झालेल्या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नसल्याने शेतकरी चिंतेत व संकटात असल्याने मात्र पुन्हा एकदा अवकाळी पावसाने वाऱ्याच्या व विजेच्या कडकडासह धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
सदर पावसाने दुपारी साडेचार च्या दरम्यान अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मात्र पळापळ सुरू झाली आहे. यात शेतातील मजूर वयोवृद्ध महिला व पुरुषांची मात्र तारांबळ उडालेले दिसून आले आहे. वय वृद्ध महिलांनी शेतातील भुईमूग काढण्यास गेले असता अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडासह पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी कामगार मात्र सैरावैरा होऊन आसरा शोधाण्यासाठी धावपळ केल्याचे दिसून आले आहे.
कुंटूर मंडळातील राहेर परिसरात मोठ्या प्रमाणात वीटभट्टी असल्याने वीट भट्टी कामगारांची मात्र धावपळ झालेले दिसून आले आहे. वीट भट्टी कामगारांनी घातलेल्या झोपडी वादळी वाऱ्याने उडालेले असल्याने अनेक वीट भट्टी कामगार यांनी आसरा शोधण्यासाठी धर पकड केल्याचे दिसून आले आहे. मात्र यात वीट भट्टी मालकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक वीट भट्ट्यामध्ये पाणी साचल्याचे दिसून आले आहेत. तयार केलेल्या विटांच्या गंजी पाण्याने भिजवून व त्या विटा चिखलमय झाल्याचे दिसून आले आहेत. म्हणून शेतकरी कामगार व वीटभट्टी कामगार व अन्य कामगार यांनी काळजी घेण्याची नितांत गरज आहे.