हिंगोली जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
हिंगोली :-भाजपाचे हिंगोली लोकसभा प्रभारी म्हणून ओळख असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांना भाजपा पक्ष श्रेष्ठीने नुकत्याच पार पडलेल्या टप्पा-2 मधील हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडणूक काळात त्यांनी निष्ठेने केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर लोकसभा चुनाव2024 अंतर्गत विविध निवडणूक ठिकाणी विधानसभा निवडणुक निरिक्षक पदाची जबाबदारी देण्यात येत आहे. आता टप्पा-5 अंतर्गत दि.13मे पासून देश हितासाठी भाजपाकडून निवडणूक लढणारे नामांकित विधिज्ञ् अॅड.उज्वल निकम यांच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभेतील *कलीना सांताक्रुज विधानसभा* निवडणूक सह-निरीक्षक पदाची मोठी जबाबदारी सुमठाणकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विषेश म्हणजे याआधी अॅड. निकम यांच्याच उत्तर मध्य मुंबई लोकसभेतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात निवडणूक निरिक्षक म्हणून त्यांची पक्षश्रेष्ठी कडून नियुक्ती करण्यात आली होती. त्याऐवजी आता ती बदलून कलीना सांताक्रुज विधानसभा* निवडणूक सह-निरीक्षक पदाची जबाबदारी त्यांच्यायावर टाकण्यात आली आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून यावेळी महायुतीकडून नक्कीच पक्षाची अदलाबदल होऊन जागा शिवसेनेऐवजी भाजपच्या वाट्याला येऊन उमेदवारी आपल्यालाच मिळेल अशी पुरेपूर खात्री असलेल्या भाजपा चे हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांचा दोन अडीच वर्षात संपूर्ण मतदारसंघ पायाखाली घालूनही त्यावेळी चक्क भ्रमनिरास झाला ज्यावेळी हिंगोली लोकसभेची जागा शिवसेने आपल्याकडे कायम ठेवत नवख्या बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली.
परंतु,अशा परिस्थितीतही न डगमगता निराश न होता एक सच्चा कट्टर भाजपा कार्यकर्ता म्हणून सुमठाणकर हे पक्षाने वेळोवेळी दिलेली प्रत्येक जबाबदारी तेवढ्याच नेटाने व खंबीरपणे पार पाडत आहेत.राज्यात लोकसभा चुनाव 2024 टप्पा-2 पासून ते टप्पा-5 पर्यंत वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातून त्यांना विविध विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुक निरिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
यापूर्वी टप्पा-2 अंतर्गत हिंगोली लोकसभेत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांना निवडून आणण्यासाठी सुमठाणकर यांनी दिवसरात्र मेहनत केली आहे.
तदनंतर भाजपा पक्षश्रेष्ठीने टप्पा -3 मधे लातूर लोकसभातेल उदगीर विधानसभा निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तर पुढे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर लोकसभेतील कन्नड विधानसभा निवडणूक निरीक्षक पदी जबाबदारी दिली होती. या प्रत्येक ठिकाणी सुमठाणकर यांनी दिलेली जबाबदारी यशस्वी पार पडली आहे.
आता आज सोमवार दि. 13मे पासून उत्तर मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील कलीना विधानसभा सह-निरीक्षक म्हणून त्यांच्यावर पक्षाने फार मोठी जबाबदारी त्यांना दिली आहे.जिथे उमेदवार म्हणून सुविख्यात विधिज्ञ उज्वल निकम भारतीय जनता पार्टी कडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.