नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या “पाकिस्तान बांगड्या घालत नाही” या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “जर पाकिस्तान बांगड्या घालत नसेल तर आम्ही त्यांना बांगड्या घालायला लावू.” “त्यांच्याकडे पीठ नाही, त्यांच्याकडे वीज नाही, आता मला कळले आहे की त्यांच्याकडे बांगड्यांचाही तुटवडा आहे,” ते बिहारमधील सभेत म्हणाले.