ता.मुलचेरा / महेश बुरमवार
मुलचेरा आज दिनांक 10-04-2024 ला एकल अभियान अंचल आलापल्ली संच सुंदरनगर* येथील विद्यालय ग्राम चिचेला,कोडीगाव, गोमणी,आंबटपल्ली या 4 विद्यालय गावात 400 माठ वनबंधू परिषद नागपूर FTS , महिला समिती कडून माठ वाटप करण्यात आले.
मे महिन्यात कड्याकाची गर्मी ,ऊन या परिस्थितीत ग्रामीण क्षेत्रातील लोकांना थंड पिण्याच्या पाणी मिळावं यासाठी नेहमी सामाजिक क्षेत्रात समाज सेवा करण्यासाठी तत्पर असणारी वनबंधू परिषद नागपूर, महिला समिती यांच्या कडून 4 विद्यालय गावात माठ वाटप करण्यात आले.
भर दुपारी माठ घेण्यासाठी गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, महिलांची गर्दी भरपुर प्रमाणात होती, ग्रामीण क्षेत्रातील महिलांना उन्हाळ्यात माठ मिळाल्याने समाधान व्यक्त केले व वनबंधू परिषद नागपूर, महिला समिती चे खुप खुप आभार व्यक्त केले,त्यावेळी सुदरनगर संच समिती , विद्यालय ग्राम समिती,ग्राम प्रमुख उपस्थित होते.
महेश बुरमवार अंचल अभियान प्रमुख, दिलीप शेडमाके कार्यालय प्रमुख,मनोज* *कलसार , श्रीराम आत्राम संच प्रमुख हे पुर्णवेळ कार्यकर्ते उपस्थित होते.