निकृष्ट कामांची चौकशी करून कारवाई करा!

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

मौजे दत्तमांजरी येथील ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना भेटून निवेदनाद्वारे मागणी

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी

 नांदेड :- माहूर तालुक्यातील मौजे दत्तमांजरी येथील ग्रामपंचायतमध्ये बोगस कामे करून किंवा कोणतेही काम न करता गेल्या ५ वर्षांपासून भ्रष्टाचार करून लाखो रुपयांनी गावाची व प्रशासनाची फसवणूक केल्याने सदर प्रकरणी सखोल चौकशी करून पैसे वसूल करणे बाबत व संबधित सरपंच व ग्रामसेवक यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करावे यासाठी उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नांदेड, अभिजीत राऊत यांना आज बुधवारी दि.१५ में रोजी माहूर येथे भेटून निवेदन दिले आहे.

 मौजे दत्तमांजरी ता. माहूर येथील सरपंचाचे पती अर्जुन बळीराम पवार हे स्वतः ग्रामपंचायतचा सर्व कारभार पाहतो. प्रत्यक्ष ग्रामसभा व मासिक सभा घेत नाही. उलट सर्व ग्रामपंचायतची कार्यकारिणी माझी आहे. मी कशाला मासिक सभा घेऊ असे उद्धटपणाने बोलतो. ग्रा.पं. सदस्य शशांक दत्ता मोरे यांनी ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी आणि दि. १४/०५/२०२४ रोजी घेतलेल्या मासिक सभेतील इतिवृतांत व ठरावाची सदस्य या नात्याने ग्रामसेवकांना काही माहिती लेखी स्वरूपात मागितली असता चिडून सरपंच पती अर्जुन बळीराम पवार याने शशांक मोरे सह इतर ग्रामपंचायत सदस्यांना अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. 

            सरपंच पती याने पूर्वीच्या कालावधीत त्याची आई विमलबाई बळीराम पवार ही सरपंच असतांना चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून काहीही काम न करता १६ लाख रुपयाचा अपहार केलेला आहे. स्वतःच्या शेतासाठी वनविभागाच्या मालकीच्या जमिनीतून रस्ता करून वनजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. यामध्ये शासनाचे २४ लाख रुपये वाया जात आहेत. 

           गावामध्ये जलजीवन मिशन योजने अंतर्गत करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात निकृष्ट दर्जाची कामे केली असून गावातील चांगले सीसी रस्ते खोदकाम करून नासधूस केले व अद्याप पर्यत मेकअप करून दिलेले नाहीत. सदर काम हे अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन होत असून यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. 

           जुने कामच नवीन असल्याचे भासवून कामे न करताच शासनाकडून सदर कामाची बोगस देयके उचलून भ्रष्टाचार केला. याबाबत आम्ही माहूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचेकडे वारंवार तक्रारी घेऊन गेलो असता त्यांनी मासिक सभेत विषय मांडण्यास सांगितल्याने आम्ही ग्रामपंचायतच्या मासिक सभेत सदर विषय उपस्थित केले असता सरपंच पती अर्जुन बळीराम पवार हा आम्हा सदस्यांना अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून आम्हाला माहिती विचारणारे तुम्ही कोण मादरचोद ! असे म्हणून त्याची पत्नी सरपंच पदावर असतांना शासनाच्या महिला सबलीकरण धोरणाची पायमल्ली करून महिला लोकप्रतिनिधीच्या हक्कावर गदा आणून स्वतःच अनधिकृतपणे सदस्य सुद्धा नसतांना ग्रामपंचायतच्या कारभारात हस्तक्षेप करीत आहे. 

       तसेच सदर इसम हा आम्हाला वारंवार तुम्ही आतापर्यत माझ्या कितीतरी तक्रारी केल्या माझे काय वाकडे झाले. असे म्हणून मला आमदाराचा पाठिंबा आहे मी कितीही भ्रष्टाचार केला तरी माझे कुणीही काहीही वाकडे करू शकत नाही असे म्हणून मनमानीपणे महिला लोकप्रतिनिधीच्या हक्कावर गदा आणत शासनाच्या महिला सबलीकरण धोरणाच्या विरुद्ध वर्तन करत ग्रामपंचायतच्या कारभारात अनधिकृतपणे हस्तक्षेप करत असल्याने दत्तमांजरी ता. माहूर ग्रामपंचायत अंतर्गत आतापर्यत झालेल्या सर्व कामाची सखोल चौकशी करून त्याचे विरुद्ध कारवाई करून दत्तमांजरी ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या भ्रष्टाचारास आळा घालून उपकृत करावे अशी नम्र विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.याबाबत कारवाई न झाल्यास चालू लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच दि.०५/०६/२०२४ पासून प्रशासन स्तरावर बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

 

 या निवेदनावर शेवंताबाई गोपीनाथ आडे, उपसरपंच ग्रा.प. दत्तमांजरी शशांक दत्ता मोरे सदस्य ग्रा.प. दत्तमांजरी कैलास गौतम कांबळे, सदस्य ग्रा.प. दत्तमांजरीआरती सावन पवार सदस्य ग्रा.प. दत्तमांजरी मनोज मुकिंदा कीर्तने माजी उपसरपंच, दत्तमांजरी दयाळू सक्रू जाधव, गोपीचंद नंदू आडे सावन तुकाराम पवार यांचेसह अनेक गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share This Article
error: Content is protected !!