प्रशासनाने मनावर घेतले तर धर्माबाद तालुक्यात रस्ते अपघाताने जाणारे दररोजचे बळी एका चुटकीत वाचू शकतात – गोविंद पाटील रोषनगावकर

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील प्रमुख राष्ट्रीय व राज्य महामार्ग विकासाच्या नियमानुसार राज्य रस्ता क्रं 260 व क्रं 268 हे रस्ते कोणत्याही गावातून प्रवेश करताना गतिरोधक टाकता येत नाहीत किंवा चौफुलीवर देखील गतिरोधक निर्माण करता येत नाहीत असा नियम शासनाच्या अधिसुचनेत अंतर्भूत आहे अस सार्वजनिक विभागातील विभागीय कार्यालयातील अत्यंत जबाबदार पदावर असलेले अधिकारी सांगतात.

जर नियमित होणारे अपघात टाळायचे असतील तर या महामार्गावर येणारे किंवा महामार्गाच्या लगत असलेल्या गावात गावकरी मंडळीनी राज्य रस्त्याच्या दोन्ही बाजूनी सहा मीटर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करून दिल्यास प्रत्येक गावात सेवा रस्ता (सर्व्हिस रोड ) सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निर्माण करता येतात हा देखील एक नियम आहे.

यामुळे प्रमुख राज्य रस्त्यावर वेगाने जाणारया वाहनांचा लगतच्या उपलब्ध सर्व्हिस रोड मुळे कसलाही व्यत्यय न येता अपघाताचे प्रमाण ही कमी होईल.तेव्हा धर्माबाद तालुक्याच्या अंतर्गत असलेल्या जुन्नी,बाभुळगांव,येताळा,बेल्लूर बु,बेल्लूर खु,नायगांव ध बाभळी ध,शेळगांव थडी, पाटोदा बु या गावातील जनतेला असे सर्व्हिस रोड भेटू शकतात का ?? या साठी आपण सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांच्या कडे चौकशी करावी.

ही दोन्ही प्रमुख राज्य रस्ते अनुक्रमे कार्यकारी अभियंता, भोकर सा.बा विभाग व कार्यकारी अभियंता देगलूर यांच्या कार्यकक्षेत अनुक्रमे येतात.

तालुक्यात अलिकडे होत असलेल्या दुर्दैवी अपघातांची मालिका पाहताना या राज्य महामार्ग क्र.260 व क्र. 268 वर महाविद्यालय,शाळां,

अनेक शासकीय कार्यालय, बसस्थानक, शासकीय भंडारगृह, मंदिर,मस्जिद,

मंगल कार्यालय व स्मशानभूमी सारखी अति महत्वाची सार्वजनिक स्थळ आहेत म्हणूनच या रस्त्यावर रहदारी नेहमीच दाट प्रमाणात असते.

कृपया याची नोंद घ्यावी व भविष्यात कोणत्याही निष्पाप व्यक्तींचा अपघाताने बळी जाऊ नये यासाठी प्रत्येक चौरस्ता,टी पाँईटची वाहतुक नियंत्रण नियमांतर्गत सुधारणा करावी. 

प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर पोलीस प्रशासन,नगरपालिका प्रसाशन,महसूल प्रशासन यांच्या अधिकारांचा योग्य रित्या समन्वयाने वापर करून शहरातील व शहरालगतच्या प्रत्येक चौफुली,टी पाँईंट,वाय पाँईंटच्या केंद्रबिंदू पासून 100 मीटर अंतरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोणतेही अवजड वाहन,चारचाकी,ट्रक,

टॅक्टर पार्किंग करता येणार नाही यासाठी कायद्याने प्रतिबंधक करावे.

अशा बेशिस्त वाहनधारकांना जबर दंड आकारावा.

शहरातील बाहयवळण रस्त्यावर भरधाव वेगाने धावणारया वाहनांना जर नियमानुसार गतिरोधक टाकून अडवता येत नसेल तर प्रत्येक चौफुली,टी पाँईंट,वाय पाँईंट वर प्रादेशीक परिवहन महामंडळाने घालून दिलेल्या वाहतूक नियमांचे पालन झालेच पाहिजे यासाठी सुधारणा करावी म्हणजे भविष्यात अपघाताने निष्पाप लोकांचे बळी जाणार नाहीत.

जर सार्वजनिक बांधकाम विभाग,पोलिस प्रशासन,नगरपालिका प्रशासन,महसूल विभाग,प्रादेशिक परिवहन विभाग याकडे गांभीर्याने बघत नसेल तर भविष्यात जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल म्हणून आपसात समन्वय साधत ही समस्या कायमची निकाली काढावी.नांदेड जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरातील मुख्य रस्त्यावर अगदी सुंदर दुभाजक निर्माण करून त्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. 

अगदी अलीकडेच बिलोली,कुंडलवाडी सारख्या अविकसीत शहराच्या मुख्य रस्त्यावरील सुशोभीकरणामुळे चेहरामोहराच बदलून गेला.परंतू धर्माबाद शहरात अतकूर पेट्रोलपंप ते बाळापूर पेट्रोलपंप तसेच ग्रिन फिल्ड स्कूल पर्यंत मंजूर झालेले रस्त्यावरील दुभाजक सुशोभीकरण व त्यावरील विद्युत रोषणाई केवळ राजकीय पक्षांच्या मतांच्या जोगव्यामुळे कांही संधीसाधू राजकीय नेत्यांच्या लालसेपोटी कायमचे हिरावून गेले ही धर्माबादकरांसाठी मोठी शोकांतिका आहे.मुख्य रस्त्यावर अनेक नामवंत समजल्या जाणारयां लोकांची अतिक्रमणे आहेत त्यामुळे शहराच्या विकासाला ग्रहण लागलेल आहे.

Share This Article
error: Content is protected !!