मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या २० मे रोजी पार पडणार आहे. त्याचा प्रचार उद्या संपणार आहे. त्यासाठी आज मुंबईत सभांचा धडाका असणार आहे.
त्यातच मुंबईत अन् राज्यात पहिल्यांदाच मोदीराज पाहायला मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे प्रथमच एकाच व्यासपीठावर असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची आज सभा पार पडणार आहे. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ही सभा शिवाजी पार्कवर होणार आहे.