सय्यद सलीमबापुंच्या नेतृत्वाखालीआझादनगर संघर्ष समितीचे नपला निवेदन.
माजलगाव ता. प्रतिनिधी/शे.अखिल
माजलगाव – शहरातील आझाद नगर येथे होत असलेल्या सिमेंटरस्त्याला नपचे इंजिनीयर व माजी नगरसेवक आळा घालत आहेत. राजकीय सूड भावनेने हा प्रकार केल्या जात आहे.त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांचे अर्धवट झालेल्या रस्त्यामुळे हाल होत आहेत.त्यामुळे हा रस्ता तात्काळ सुरू करण्यात यावा,नसता, आझाद नगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर दि.20 रोजी रास्ता रोको करन्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे आझाद नगर संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला.
माजलगाव नगर परिषदेत भ्रष्ट कारभाराने उच्चांक गाठला आहे. आझाद नगर येथे होत असलेला धारूररोड ते बायपास सिमेंट रस्त्याला नप मुख्याधिकारी, इंजिनियर व येथील एक माजी नगरसेवक राजकीय सुडभावनेने अडथळे आणत आहेत.जाणून बुजून हा रस्ता अर्धवट काम करून सोडला आहे.त्यामुळे रस्त्याविना येथील नागरिकांचे हाल होत आहेत.सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे.त्याचप्रमाणे शहरात झालेले नाली बांधकाम सिमेंट रस्ते पाईपलाईन निकृष्ट,बोगस दर्जाची झाली आहेत.या सर्व कामाची कॉलिटी कंट्रोलद्वारे तपासणी करन्यात यावी,त्याचप्रमाणे ओपन स्पेसवरील सर्व अतिक्रमणे काढून शहरातील सर्व डीपी रोड चालू करण्यात यावेत यावेत.तसेच नप मध्ये आलेल्या शासकीय फंडात मोठा भ्रष्टाचार झाला आहे याचीही चौकशी करण्यात यावी.नसता 20 मे रोजी आझाद नगरच्या पुलाजवळ राष्ट्रीय महामार्गावर माजी नगरसेवक स.सलीमबापू यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. व पुढील आंदोलन विभागीय कार्यालयावर करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे आझाद नगर संघर्ष समितीच्या वतीने नगरपरिषदेला देण्यात आला आहे.या निवेदनावर स.फारुखअण्णा,मेहबूब चुन्नू, रईसकादरी,शेख सादेक इब्राहिम, समशेरखान साहेबखान पठाण, सत्तारभाई टेलर,सय्यद रहीम फिटर,बाबासाहेब साळवे,सोनबा धिरे,शेख जमील,अतिक अन्सर खान,महेमुब मिरझा बेग,शेख इलियास मासुम,इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
‘चौकट’
आ.प्रकाश सोळंके यांनी राजकीय सूड भावनेने रस्ता अडवला.
सय्यद सलीमबापु.
शहरातील आजाद नगर ही हातावर पोट भरणाऱ्या गोरगरिबांची मोठी वस्ती आहे.ठिकाणी दलित,मुस्लिम मराठा,बहुजन अठरापगड जातीचे लोक राहतात.आ.प्रकाश सोळंके यांना या प्रभागातून मोठा राजकीय विरोध होतो.आशी आकस भावना मनात बाळगून आ.प्रकाश सोळंके या वस्तीकडे पाहत आले आहेत. हा होत असलेला सिमेंट रस्ताही त्यांनी मुख्याधिकारी,इंजिनियर व येथील एका माजी नगरसेवकाला हाताशी धरून राजकीय सूड भावनेने अडवल्याचा आरोप माजी नगरसेवक सय्यद सलीमबापू यांनी आ.सोळंके यांच्यावर केला आहे.