बाळापुर वासियांच्या मरण यातना पावसाळ्यापूर्वी तरी थांबतील का?

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

•संथ गतीने चाललेल्या व वरचेवर पडत असलेल्या पावसामुळे काल सात दुचाकी वाहन पडले••

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

नांदेड : जिल्यातील धर्माबाद शहरा मधील बाळापुर वासियांच्या मरण यातना पावसाळ्यापूर्वी तरी थांबतील का असा आर्त प्रश्न बाळापूरवासीय विचारत असून तेलंगाना राज्यांशी जोडणाऱ्या व बाळापूर मार्गे जाणाऱ्या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने चालू असल्यामुळे व वरचेवर पाऊस पडत असल्यामुळे चिखल होऊन वाहनधारकं स्लिप होऊन पडत आहेत. काल पाऊस पडल्यानंतर अशा सात घटना घडल्या असून सुदैवाने किरकोळ दुखापत झाली आहे. 

 

 सदरील रस्त्यावर बाळापुरवासींया मधील काही विघ्न संतोषी लोकांनी आक्षेप घेतले होते. त्यामुळे हे काम बऱ्याच वेळेस चालू होऊन बंद पडले होते. दैनिक देशोन्नतीने यासाठी वारंवार पाठपुरावा करून सत्य परिस्थिती उजेडात आणली होती.नंतर हे काम चालू झाले असले तरी व नांदेड जिल्ह्यातील नामांकित शारदा कन्स्ट्रक्शन कंपनी ही काम करत असली तरी त्या कंपनीचे काम आज घडीला अतिशय मंद गतीने चालत आहे.

 

 गेल्या सप्ताहात किमान तीन वेळेस सायंकाळच्या सत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे खोदून ठेवलेल्या रस्त्यावर व निकृष्ट दर्जाचे मुरूम टाकल्यामुळे चिखल झाल्यामुळे वाहनधारक घसरून पडत आहेत. 

 

शेवटी बरेच वाहनधारकांनी एच.पी.पेट्रोल पंपाच्या समोरून बाळापुर कडे जाणाऱ्या पांदण रस्त्यावरून जाणे पसंत केले.उपरोक्त पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच सदरील रस्त्याच्या कामास पुन्हा चालू झाले असले तरी हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊन बाळापुर वासिंयांच्या मरणयातना कमी होतील याविषयी लोक आशा बाळगून आहेत.

Share This Article
error: Content is protected !!