गहाळ झालेले 18 लाख 85 हजारांचे महागडे मोबाईल जप्त करून मुळ मालकास बहाळ

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – नांदेड जिल्हा पोलीस दलाने विविध सार्वजनिक ठिकाणातून गहाळ झालेले महागडे 118 मोबाईल जप्त केले आहेत.त्यातील 60 मोबाईल मालकांना परत देण्यात आले आहे. जप्त केलेल्या एकूण मोबाईलची किंमत 18 लाख 85 हजार रुपये आहे.

नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर पोलीस ठाणे यांच्याकडे मिसींग(गहाळ) या प्रकारात मोबाईल बाबत आलेल्या तक्रारींचा शोध सुरू होता.

प्रत्येक पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करून मिसिंग झालेल्या मोबाईलचा शोध सुरू होता.स्थानिक गुन्हा शाखेने सुध्दा यात आपला वाटा उचलला.पोलीसांनी एकूण 118 मोबाईल शोधले आहेत. त्या सर्व मोबाईलची किंमत 18 लाख 85 हजार रुपये आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते 60 मोबाईल मालकांना परत देण्यात आले आहेत.इतर मोबाईल बाबतची माहिती, त्यांचे IMEI क्रमांक पोलीस दलाने Facebook Page (Nanded Police), Twitter(#Nanded Police) वर अपलोड केली आहेत. नागरीकांनी त्या यादी आपला IMEI क्रमांक ओळखून पोलीस ठाणे नांदेड येथून आपला मोबाईल परत घेवून जावा असे आवाहन केले आहे.

पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार,डॉ.खंडेराय धरणे,पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार,उदय खंडेराय,सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक गंगाप्रसाद दळवी, पोलीस अंमलदार सुरेश वाघमारे,राजेंद्र सिटीकर,दिपक ओढणे,रेशमा पठाण,विलास राठोड,दावीद पिडगे,गणेश वाघमारे,कृष्णा तलवारे,किरणकुमार वाघमारे, मोहम्मद आसीफ,एजाज खान पठाण, काशीनाथ कारखेडे, अनिल बिरादार,दिपक शेवाळे, किशोर जयस्वाल,राजीव बोधगिरे, विलास कदम,अकबर पठाण,व्यंकटेश सांगळे,दिपक राठोड यांनी हे मोबाईल जप्त केले आहेत

Share This Article
error: Content is protected !!