कुत्रे चावल्यानंतर उपचार न करणे बेतले जीवावर!

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

[चोंडी येथील गंगाधर पाटील नरवाडे यांचे तीन महिन्यातच निधन]

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

नांदेड – जिल्यातील धर्माबाद तालुक्यात कुत्रे व त्यातल्या त्यात पिसाळलेले चावल्याच्या नंतर उपचार न करता लग्नकार्यात व्यस्त राहणे जीवावरच बेतले असून धर्माबाद तालुक्यातील सुपरिचित व्यक्तिमत्व चोंडी येथील गंगाधर पाटील नरवाडे वय 45 यांचे या कारणाने आज दुःखद निधन झाले. 

कुत्रे व त्यातल्या त्यात पिसाळलेले चावल्यावर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेणे व त्याचे तंतोतंत पालन करणे गरजेचे असते. चोंडी येथील गंगाधर पाटील नरवाडे यांना तीन महिन्यापूर्वी गावात पिसाळलेले कुत्रे चावले होते.पण लगीन घाई व इतर कार्यक्रमात ते एवढे व्यस्त होते की उपचार करायला त्यांना वेळ लागला.दरम्यानच्या काळात आभाळ व ते मेघगर्जना व पाऊस युक्त असले तर त्याचा प्रतिकूल परिणाम कुत्रा चावलेल्या रुग्णावर होत असतो. त्याला रेबीज म्हणतात. तसाच परिणाम आज गंगाधर पाटील नरवाडे यांच्यावर झाला.ते हुबेहूब कुत्र्यासारखे भुंकू लागले व त्यांना वेदना असह्य झाल्यामुळे त्यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी व दोन मुली असा परिवार असून आजच सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर तातडीने अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी गावकऱ्यांनी एकच हंबरडा फोडला.

          *चौकट-*

कुत्रे चावल्याच्या नंतर रेबीज प्रतिबंधक लस घेणे अतिशय गरजेचे असते.सदरील लस घेतली नाही तर कुत्र्याच्या चाव्या नंतर त्याच्या लाळेतून रॅबिजचे अतिसूक्ष्म विषाणू माणसाच्या रक्तात मिसळतात व निसर्गाच्या पोषक वातावरणात ते माणसाच्या शरीरात उफाळतात तेव्हा कुत्रे चावलेला माणूस अगदी कुत्र्यासारखेच हालचाली करत असतो त्यासाठी कुत्रा चावल्यानंतर तात्काळ रेबीज प्रतिबंधक लस घेऊन पुढील उपचार करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Share This Article
error: Content is protected !!