बालादेवी देवस्थान ची जमीन शासनाने ताब्यात घ्यावी आणि देखभालीसाठी प्रशासक नियुक्त करा…सामजिक कार्यकर्ते हणमंत पाटील जगदंबे

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

जिल्यात भुमाफियानं कडून देवस्थाच्या जमिनी विक्री करण्याचा घाट

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील धर्माबाद शहरा मधील मौजे बाळापूर स्थित असलेले श्री बालादेवी देवस्थान च्या नावे असलेली जमीन आता त्या ठिकाणी कोणीही वारस नसल्यामुळे शासनाने ही जमीन ताब्यात घेऊन देखभाल करण्यासाठीं प्रशासक नियुक्त करण्यात यावे अशी मागणी जेष्ठ राजकिय विश्लेषक तथा सामाजिक कार्यकर्ते हणमंत पाटील जगदंबे यांनी धर्माबाद तहसिलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

श्री बालादेवी देवस्थाने जमिनीचे देखभाल अर्चक म्हणून अनापूर्णाबाई विठलराव येळवतकर हे करीत होते पण त्यांचे निधन झाल्यापासून सदरच्या विरासत मध्ये वारस म्हणूण कायदेशीर रित्या कोणीही पुढे आले नसल्याने प्रशासनाने ही जमीन ताब्यात घ्यावी आणि जमिनीची देखभाल व मंदिराची देखभाल करण्यासाठी प्रशासक नियुक्त करावे असेही हणमंत पाटील जगदंबे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

बाळापूर स्थित असलेले श्री बालादेवी देवस्थान यांच्या कडे सर्वे गट क्रमांक 586/1मध्ये 26 गुंटे, गट क्रमांक 564/1मध्ये 1हेक्टर 65 आर,गट क्रमांक 564/2मध्ये 17 गुंटे असे क्षेत्र असून उपरोक्त जमीन शासनाने ताब्यात घ्यावी आणि जमिनी ची देखभाल व मंदिर संस्थान ची देखभाल करण्यासाठी प्रशासक नियुक्त करण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सदरील देवस्थानची जमीन तेलंगणातील येळवत व वाढवण येथे पण असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.यांचा शासनाने शोध घेऊन ताब्यात घ्यावी

Share This Article
error: Content is protected !!