विज्ञान विभागाचा निकाल ९९ टक्के तर
कला शाखेचा निकाल ९०. ६० टक्के
माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी
माहूर:- येथील बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कनिष्ठ महाविद्यालय माहूरचा १२ वी परीक्षेचा निकाल ९५.५० टक्के लागला असून आतापर्यंतच्या निकालातील हा रेकाॅर्डब्रेक निकाल ठरला आहे.
कला शाखेतून ४६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते यापैकी प्रथम श्रेणीत ०६ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ८९.०९ टक्के लागला असून,कला शाखेतून प्रथम येण्याचा बहुमान सागर नरेश वायकुळे या विद्यार्थ्याने प्राप्त केला आहे. प्रीती विलास पारदेवाड द्वितीय क्रमांक तर कीर्ती गजानन शिंदे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
त्याचप्रमाणे,१२वी विज्ञान शाखेतून १०२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.
त्यापैकी १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.प्रथम श्रेणीत ३५ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान विभागाचा ९९.०० निकाल लागला आहे. विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा बहुमान काया दत्ता जाधव या विद्यार्थीनीने प्राप्त केला आहे. स्नेहा परमेश्वर जगदाळे ही द्वितीय तर स्नेहल परमेश्वर पाऊलबुद्धे ही तृतीय आली आहे. तसेच सृष्टी अनिल जाधव ही विद्यार्थीनी चतुर्थ आली आहे.
बळीराम पाटील मिशन मांडवीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांनी दोन तपांपूर्वी माहूर सारख्या शैक्षणिक दृष्टीने मागासलेल्या तालुक्यातील माहूर शहरात शैक्षणिक संस्थेची मूहूर्तमेढ रोवली होती. हे वटवृक्ष आता फळे देतांना दिसत आहे. याच विभागातून अनेक विद्यार्थी एम.बी.बी.एस. ला प्रवेशित झालेले आहे. त्याच धर्तीवर सर्व गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांंचे संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड,सचिव सौ. संध्याताई राठोड,उपाध्यक्ष किशोर जगत, सहसचिव नकुल राठोड,कोषाध्यक्षा नेहाताई राठोड, प्र.प्राचार्य डॉ. तुळशीदास गुरनुले यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील दैदीप्यमान वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक निलेश पाटील,प्रा.पी.आर.राठोड,प्रा.अभिजित जगत, प्रा.संजय चव्हाण, प्रा.कृष्णा दुगाळे,प्रा.निलेश पेंटावार, प्रा.सिद्धार्थ मुनेश्वर यांचे अनुभवी व अभ्यासपूर्ण असे उत्तम मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलेले असून, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहे.