गागलेगावात आजी आजोबाचा अनोखा विवाह सोहळा होणार संपन्न…

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रतिनिधी/ अशोक वाघमारे 

नांदेड – बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथील बुद्धलवाड परिवारांच्यावतीने आपल्या आई वडिलांचा कृतज्ञ व्यक्त करणारा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त श्रीमंत विठ्ठलराव श्रीमती राजाई यांचा अनोखा शुभ विवाह सोहळा 25 मे रोजी मोठ्या दिमागदार पद्धतीने पारंपारिक रीतीरीवाजाप्रमाणे 21 प्रकारची दाग दागिने पैठणी शाही अलंकार वस्त्रालंकार शेरवानी फेट्यासह शिवाजी शेवंती घोड्याची वरात ऑर्केस्ट्रा मंगलाष्टके नारळी कल्याण मंडप विधिवत पूजन सर्वकाही येतोचित करून गावातील 600 पेक्षा अधिक कुटुंबीयांना मूळ पत्रिका (गुळवाटी) सह गावाला चुलबंद (चुलीला इबित) व गावातील प्रतिष्ठित मंडळींना फेट्यासहसन्मान अगदी अत्तर लावून या विवाह सोहळ्यात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवण्यासाठी मुस्लिम बांधवांसाठी ताज टोपी व आई-वडिलांचा तुलाभार म्हणून नारळ व शालेय साहित्य वजनाचा तुलाभार व श्रद्धा कांचन ताई यांच्या सुश्राव्य हरी कीर्तनाचा कार्यक्रम व रात्रभर भारुड गवळणी अभंगवाणीचा हरी जागर पंचक्रोशीतील साधुसंतांचा व टाळकऱ्यांचा वारकऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा नांदेड येथील अभिवक्ता बांधवांचा सत्कार आधी कार्यक्रमाने दिमागदार शाही विवाह सोहळा संपन्न होणार असून या अनोखा विवाह सोहळ्याला उपस्थित राहून आमच्या आई-वडिलांना शुभ आशीर्वाद द्यावेत असा आव्हान बुद्धलवाड परिवार व समस्त गावकरी मंडळ गागलेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे

Share This Article
error: Content is protected !!