नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नांदेड – नायगाव तालुक्यातील मौजे टेंभुर्णी येथील एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले शहीद पोचिराम कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद च्या नामांतरासाठी मोठा लढा उभारून व आंदोलन करून मोठा लढा दिला आहे आणि त्यांच्या क्रांतिकारी लढ्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सदर विद्यापीठाला देण्यात आली आहे. पोचीराम कांबळे यांच्या क्रांतिकारी लढ्यामुळे सदर विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर करण्यात आले आहे याचे योगदान व श्रेय व पोचिराम कांबळे यांना असून या क्रांतिकारी योद्धा मराठवाड्यातील सबंध बहुजनांच्या मनामध्ये आजारावर आहेत.
प्रश्नाचे अर्थ एका ओळीत होता पोचिराम राम म्हणणे टाळीत होता या युक्तीप्रमाणे शेवटपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जप करीत क्रांतिकारी लढ्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित केले होते आणि तो लढा शेवटपर्यंत यशस्वी करण्यात आला होता . या यशस्वी लढ्यात धोंड्यामाई कांबळे यांचे देखील महत्त्वाची भूमिका राहिल्या असल्याने त्यांचे देखील तेवढेच कौतुक त्यावेळी केले जात होते. अशा धाडसी व क्रांती माता धोंड्या माई कांबळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या राहत्या घरी नांदेड हडको येथे दिनांक 21 /5 /2024 रोजी करण्यात येत आहे. त्यांच्या पाश्चात मुले, मुली,नातवंडे, सून, असा परिवार आहे.