यश विलास पेंधे यांची 12 वी परीक्षेत उत्तुंग भरारी

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे 

नांदेड – उमरखेड तालुक्यातील बिटरगांव येथील वसंतराव नाईक कृषी विद्यालय चि.यश विलासराव पेंधे यांनी 81% घेऊन यश प्राप्त झाले आहे. दिनांक 21 /5 /2024 रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक बोर्डाचा निकाल लागला असून यात बिटरगाव येथील शेतकरी पुत्र यश विलासराव पेंदे यांनी गगन भरारी घेतली आहे. यश पेंदे यांचे आई-वडील शेतकरी कामगार असून शेतामध्ये काबाडकष्ट करून मुलांच्या शिक्षणासाठी अहो रात्र मेहनतीने यश पेंदे यांना शिक्षण दिले असून त्या आई-वडिलांच्या कष्टाचे फळ प्राप्त झाले आहे. यश पेंदे यांच्या यशाचे बिटरगाव येथील वसंतराव नाईक कृषी विद्यालय येथील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांच्याकडून सुरेश शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे व गावातील गावकऱ्यांच्या वतीने देखील कौतुकाची व आशीर्वादाची थाप यश पेंदे यांच्यावर टाकल्याचे दिसून आली आहे. या यशाबद्दल यश पेंदे यांच्या आई वडिलांमध्ये आनंदाचे व समाधानी चे वातावरण असल्याचे दिसून आले आहे. आणि गावातील सर्वच समाजबांधवातून यश पेंदे यांना शुभेच्छा देण्यात आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!