प्रतिनिधी – शंकर मुत्येलवार:
मूलचेरा – तहसील कार्यालय मुलचेरा तालुका मुलचेरा जिल्हा गडचिरोली येथील पुरवठ निरीक्षक श्री राहुल भाऊजी डोंगरे वय 40 वर्ष पद पुरवठा निरीक्षक वय 40 वर्ष यांनी 500 रुपये लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो पथकाने आज रंगेहात पकडले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की यातील तक्रारदार मुक्काम मुकडी टोला पोस्ट गोविंदपुर तालुका. मुलचेरा जिल्हा. गडचिरोली येथील रहिवासी असून ते शेतीचे व्यवसाय करतात.
तक्रारदाराची आई व नामे जीवनकला गेडाम तिचे नाव असलेल्या रेशन कार्ड मध्ये वडील मजवा बहीण भावाची व भावाची मुलगी यांची नावे होती .तक्रारदार यांचे माजवा भाऊ गुरुदास यांच्या कुटुंबाच्या नवीन रेशन कार्ड वहिनी नामे वर्षा गुरुदास गेडाम यांचे नावे दिनांक 30 /11/ 2024 रोजी तयार करण्यात आले. त्यावर थम मशीन वर नाव न आल्याने रेशन मिळत नसल्याचे वहिनी वर्षा यांनी सांगितले तक्रारदाराची वहिनीची रेशन कार्ड वर रेशन मिळत नसल्याने महाफुड या साईडवर कागदपत्रे अपलोड करण्याकरिता 500/रू. लाच रकमेची मागणी केली .
.तक्रारदार यांनी लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाज लुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली कॅम्प मूलचेरा येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविली.
पोलीस उपअधीक्षक श्रीमती अनामिका मिर्जापुरे ला.प्र.वि. गडचिरोली यांचे पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीय रित्या चौकशी करून सापळा रचून कारवाईचे आयोजन केले .असता त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदाराचे वहिनीचे रेशन कार्ड वर रेशन मिळत नसल्याने महाफुड साईडवर कागदपत्रे अपलोड करण्याकरिता आरोपी श्री राहुल भाऊजी डोंगरे पद पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय मुलचेरा तालुका मुलचेरा जिल्हा गडचिरोली यांनी 500/- रुपयाची पंच साक्षीदार समक्ष सुस्पष्ट मागणी करून 500 /रुपयाची लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडून आल्याने त्यांच्याविरुद्ध पोस्ट मुलचेरा येथून गुन्हा दाखल करण्यात आले आरोपी श्री राहुल भाऊजी डोंगरे यांचे आष्टी येथील निवासस्थानाचे अँटी करप्शन ब्युरो गडचिरोली, चम्मू कडून जळती घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री राहुल माकणीकर अँटी करप्शन ब्युरो नागपूर श्री सचिन कदम अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शन व पोलीस उपाध्यक्ष श्रीमती अनामिका मिर्जा पुरे यांचे पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले पो.ह.वा.शंकर डांगे पोलीस निरीक्षक किशोर जौजारकर पोलीस निरीक्षक संदीप उडान सिनारे संदीप गोरमोडे प्रफुल डोलीकर सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केलेली आहे.
पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कार्यालय गडचिरोली दूरध्वनी क्रमांक :- 07132_295020
टोल फ्री क्रमांक:- 1064