टिकेपल्ली येथील नालागोंडु देवी बोनालु कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती..!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

शंकर मुत्येलवार: आलापल्ली शहर प्रतिनिधी

मुलचेरा : तालुक्यातील टिकेपल्ली येथे नालागोंडु देवीच्या बोनालू पूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा टिकेपल्ली येथे नालागोंडु देवी बोनालू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.नालागोंडु देवीच्या बोनालू कार्यक्रमाला आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा निरीक्षक व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून देवीची दर्शन घेतले.यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी नालागोंडु देवी कडे प्रार्थना केली.

 

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,महागाव ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे,नरेंद्र गर्गम,दिनेश मडावी,अजय नैताम,प्रमोद गोडशेलवारसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!