नांदेड प्रतिनिधी / अशोक वाघमारे
नांदेड – धर्माबाद तालुक्यातील मौजे अटाळा जुने गाव येथून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा हे अवैध्य रेती गेले महिन्याभरापासून चालू असून प्रशासन याकडे मात्र दुर्लक्ष जाणून बुजून करत आहेत. सदर वाळू उपसा ताफ्याच्या साह्याने होत असून ही अवैध वाळू उपसा दिवसा ढवळ्या रात्री बे रात्री सुमारे शेकडो ब्रास रेती उत्खन होत आहे.
सदर वाळू व्यवसायिक हे अटाळा येथील असून ते तीन ते चार जणांच्या संगनमताने व संबंधित महसूलच्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाठबळामुळे ही अवैद्य रेती राजरोषपणे उपसा करत आहे आठाळा येथील वाळू माफियांना महसूल प्रशासनाचा चांगलाच आशीर्वाद व पाठबळ असल्याचे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. पण वाळू व्यावसायिकांनी निवडणुकीच्या आचार संहितेमध्ये वाळू उपसा केले आहे. आणि सदर नियमांचे उल्लंघन करून व नियम धाब्यावर बांधत दंड शाही दाखवून गावातील नागरिकांना यावर व विरोधात बोलले तर त्यांना बघून घेऊ अशी दमदाटीच्या जोरावर आणि संबंधित अधिकारी यांच्याशी आर्थिक तडजोडी करून अवैध रेती उपसा करत आहे. सदर वाळू व्यावसायिक यांनी शासनास न जुमानता व शासनाचे नियमांचे उल्लंघन करून गेल्या अनेक महिन्यापासून अवैध वाळू उपसा करत आहे. यातून शेकडो ब्रास दिवसाढवळे रेती उपसा होता असून याकडे मात्र शासनानी झोपेचे सोंग घेत आहे.
आटाळा जुने गाव येथील गोदावरी नदी पात्रातून ताफ्याच्या साह्याने नदीकाठी ऐवद्य वाळू साठा करून ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने अटाळा व परिसरातील गावांमध्ये टाकत असल्याची माहिती गावातील काही सुज्ञ नागरिकांनी दिली आहे. आटाळा येतील काही नागरिकांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तीव्रज नाराजी देखील व्यक्त केली आहे. संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी जाणून-बुजून वाळू व्यवसायिकावर दुर्लक्ष करत असतात गावांमध्ये येऊन देखील अवैद्य वाळू उत्खन होत असलेल्या जागी न जाता त्याकडे मात्र पाठ फिरवून गावातील नागरिकांना उडवा उडवी चे उत्तरे देत असतात. म्हणून सदर वाळू माफियावर वरिष्ठांनी कारवाई करून त्यांना दंड ठोटावण्यात यावा व चालू असलेले अवैध पणे वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी या अवजड वाहतुकीमुळे झालेल्या रस्त्याचा मात्र चकणाचोर होताना दिसून येत आहे. रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे जात असून रस्ता वर खड्डे पडत असल्याची चित्र दिसून येत आहे. म्हणून अवैध पणे चालू असलेली रेती तात्काळ बंद करण्याची मागणी आता गावकऱ्याकडून होताना दिसून येत आहे.