मोदीचा बद्दलचा विरोध मतदानातून व्यक्त होईल !….

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एका पक्षाचे दोन पक्ष करणाऱ्या भाजपाच्या विरोधात मतदान जाणार निश्चित मानले जात आहे.महाराष्ट्रात खूप विरोधी वातावरण होते, ही गोष्ट खरी असली तरी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात केलेले काम व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घेतलेली मेहनत प्रतापरावांना तारुन नेईल अशी परिस्थिती दिसत नाही.जसे राजकीय क्षेत्रात एका पक्षाची दोन पक्ष झाले तसे पत्रकार क्षेत्रातही गोदी मीडिया निर्माण होण्यास भाजपा कारणीभूत मानल्या जाते. धनदांडग्या उमेदवाराकडून रुपये घेऊन मतदारांची दिशाभूल करणे हे मतदारांना आवडत नाही हे यावेळी स्पष्ट झाले आहे.

  लोकसभा निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन पक्ष तयार केले. अजित पवाराचा एक गट.दोन शिवसेना अस्तित्वात आल्या. माजी आमदार वसंतराव चव्हाण व वंचित बहुजन आघाडीकडून अॅड. अविनाश भोसीकर हे निवडणुकीस उभे होते. अनुभव आणि आर्थिक पाठबळ नसल्यामुळे मुस्लिम आणि दलित मतदार त्यांच्याकडे वळला नाही. खरी लढत काॅंग्रेस व भाजपातच झाली नाही. खरी लढत झाली संविधान बचाव विरुद्ध भाजपा तसेच भाजपा विरुद्ध *सकल मराठा सत्ताधाऱ्यांना पाडा आणि जोरदार पाडा* नांदेड लोकसभेत सुरुवातीला एड. अविनाश भोसीकर यांनी प्रचारात आघाडी घेतली होती, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ब-याच ठिकाणी मराठा तरुणांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना न जुमानता त्यांना जशास तसे उत्तर दिले.शेवटच्या टप्प्यात अविनाश भोसीकर हे आपल्या अनुभवाने कमी पडले व काॅंग्रेस व भाजपातच खरी लढत झाली.वसंतराव चव्हाण यांना निवडूण आणण्यासाठी त्यांच्या पाहुण्या रावळ्यांनी कुठेच कसर ठेवली नाही मग ते भाजपात असो की राष्ट्रवादी किंवा शिवसेना कोणत्याही पक्षात असो की धार्मिक क्षेत्रात असो‌. त्यांनी मात्र वसंतराव चव्हाणांचे काम केले आहे.

 सुरुवातीला प्रताप पाटलांना सोपी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात आशादायक ठरली हे सांगणे अवघड आहे. नांदेडची मोदिजींची सभा व मुखेड येथील नितीन गडकरी यांच्या सभेमुळे मतदारावर काहीच फरक पडला नाही.

 तसेच निवडणुकीच्या तोंडावर मोदिजींच्या कामावर खूष होऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काॅंग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. अशोकराव चव्हाण हे अनुभवी व राजकीय सक्षम नेते असल्यामुळे त्यांना ईडी चौकशीला घाबरत नाहीत हे त्याने अनेक वेळा स्पष्ट केले. मात्र अशोकराव चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यात तीव्र नाराजी दिसून येते. प्रारंभी भाजपात आल्यानंतर त्यांच्याकडे मोजकेच कार्यकर्ते आले होते. मात्र पुढील काळात हजारो कार्यकर्ते त्यांच्या सोबत आले. प्रत्येक तालुक्यात चव्हाण कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग आजही जिल्ह्यात आहे. 

त्यामुळे अशोकराव चव्हाण यांनी कुठेही कसर न ठेवता सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावले व स्वतः ही रात्रीचा दिवस करून प्रतापरावांना निवडूण आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर हे विजयी होतीलच पण त्यांच्या विजयात अशोकराव चव्हाण यांचा वाटा मोठा असेल असा अंदाज कोणीही बांधू शकत नाही.

 दरम्यान जरांगे फॅक्टरचा भाजपला फटका बसेल असे बोलल्या जात आहे,तर जरांगे मुळे सर्व ओबिसी एक झाल्यामुळे काॅंग्रेसला फटका बसेल असेही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आता घोडा मैदान जवळच आहे. मागच्या लोकसभेत वंचितला एक लाख 66 हजाराची हजारांची लिड देणारा मतदार यावेळी कुठे गेला हे शोधण्याची गरज आहे. मुस्लिम समाजाला संपूर्ण महाराष्ट्रातून वंचित शिवाय कोणीही उमेदवारी दिली नाही.

 परंतु त्यांच्याकडे काँग्रेसचा पंजा हा पर्याय होता.निवडणूक खऱ्या अर्थाने दोन-तीन टप्प्यात होणे आवश्यक होते.निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन बदलल्यामुळे जनतेचा विश्वास मतदानावरील विश्वास कमी होत आहे नेमके चित्र काय होईल हे चार जूनलाच कळेल एवढे मात्र खरे.

Share This Article
error: Content is protected !!