मुलचेरा तालुका प्रतिनिधी/शंकर मुत्येलवार
मुलचेरा: तालुक्यातील भगवंतराव प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा लगाम येथे वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च
माध्यमिक आश्रम शाळेतील शैक्षणिक सत्र 2024 – 2025 करिता एक दिवसीय शैक्षणिक नियोजन सभा घेण्यात आले.
या सभेचे मुख्य मार्गदर्शक वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी चे उपाध्यक्ष आदरणीय बबलू भैया हकीम कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. आणि तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय शाहीन भाभी हकीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागीय महिला अध्यक्षीय उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य शेख सर तसेच ज्येष्ठ लिपिक मुक्तदीर भैया शेख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले.
वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी चे उपाध्यक्ष आदरणीय बबलू भैया हकीम यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शाहिन भाभी हकीम यांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात. व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्तावना भगवंतराव प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा लगाम येथील मुख्याध्यापक श्री माननीय प्रकाश दुधबावरे सर यांनी केली.शिक्षकांना मार्गदर्शन करताना प्राचार्य शेख सर यांनी शिक्षकांनी कशाप्रकारे अध्यापन करायचं याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागीय महिल अध्यक्षीय शाहिन भाभी हकीम यांनी आपल्या भाषणात शिक्षकांनी विविध प्रकारचे स्किल डेव्हलप करून विद्यार्थ्यांना ज्ञानर्जन करून शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे .आजचा युग टेक्नॉलॉजी युग आहे या युगात टिकण्याकरीता विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मिळून एकत्रित काम करणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय भाषण करताना वनवैभ शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष शिक्षकांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले .आपल्या मार्गदर्शनात बोलताना म्हटले की सर्व शिक्षकांनी मुख्यालय राहून विद्यार्थी कडे पुरेपूर लक्ष द्यावे व सकाळी संध्याकाळी जादा वर्ग घ्यावे. विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढवावी अगर गुणवत्ता वाढली नाही तर विद्यार्थी पालक आपल्या शाळेकडे दुर्लक्ष करतील करिता सर्वांनी तन-मन दानाने विद्यार्थ्याकडे लक्ष दिले पाहिजे .
क्रीडा स्पर्धा करिता क्रीडाशिक्षक निवड करणे क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धा करिता विद्यार्थ्यांना कबड्डी खो-खो हॉलीबॉल हँडबॉल उंच उडी लांब उडी गोळाफेक भालाफेक इत्यादी क्रीडा प्रकारचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. क्रीडा प्रकारांमधून विभागीय व राज्यस्तरीय राष्ट्रीय थरावर जाऊन वन वैभव शिक्षण मंडळाचे नाव रोशन केले पाहिजे .
अधीक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वयंपाक गृहाकडे विशेष लक्ष देऊन स्वच्छता ठेवावी. विशेष करून महिला अधीक्षिका यांनी विद्यार्थिनीकडे विशेष काळजी पूर्वक लक्ष द्यावे.
वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित भगवंतराव प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळांतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते.
आभार भगवंतराव प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा बुर्गी येथील उपक्रमशील शिक्षक सन्माननीय वैभव विजयराव चिमरालवार सर यांनी मानले.