नगर पालिकेने घरावर चिटकवलेले क्यू आर कोड बिनकामाचे

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

बिन कामाच्या क्यूआर कोड साठी लाखो रुपयांची उधळपट्टी करूनही शहरात ठीक-ठिकाणी कचऱ्याचे ढीग

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड* 

नांदेड : जिल्यातील सर्वच नगर पालिकेचे साफसफाई कर्मचार्या कडून घरावर चिटकवलेले क्यू आर कोड स्कॅन करून घरोघरी जाऊन कचरा कधी घेऊन जाणार याची जवळपास दोन महिन्यापासून नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे.

शहरातील अनेक नगरातील कचरा रोजच्या रोज न उचलल्यामुळे स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत.

सर्वच शहराजवळ मुबलक पाणीसाठा असूनही चार ते पाच दिवसाआड नागरिकांना पाणी मिळत आहे.त्यातही पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

 *नागरिकांना नागरी सुविधा मिळविण्यासाठी सतत संघर्ष करावा लागत आहे.*

मूलभूत सुविधा मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त आहेत.शहरातील नागरिकांच्या घरावर क्यूआर कोडचे स्टिकर चिकटवून जवळजवळ दोन महिने होत आले तरी त्याचा कवडीचाही उपयोग झाला नाही.स्वच्छता मिशन’चा नुसता देखावा उभा केला असून केवळ गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातील लाखो रुपयांची ही उधळपट्टीच असल्याचे बोलले जात आहे. 

 घनकचरा व्यवस्थापन व हाताळणीसाठी पालिका प्रशासनाने अव्वाच्या सव्वा निधी खर्च करुन ही शहराच्या बाहेर घनकचरा केंद्र निर्मितीमध्ये कचऱ्याचे ढिगारे ते ढिगारे पडून आहेत.आता याच प्रक्रियेचा एक नवीन भाग म्हणून शहरातील रस्त्यासाठी, नालीसाठी आणि घरोघरी ‘क्यूआर कोड’ चिकटविण्यात आले आहेत.या कामासाठीही लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याची चर्चा होत आहे.

 क्यूआर कोड लावून जवळ जवळ दोन महिने उलटले ते आता शोभेचे ठरत असल्याने बिनकामाच्या कामावर लाखो रुपयांची उधळण अयोग्य असल्याचा संताप जनमानसात उमटत आहे.शासनाच्या स्वच्छता मिशनचे घोडे केवळ कागदोपत्रीच नाचविण्याचे काम केले जात असल्याचा आरोप नागरिकांतून व्यक्त होत आहे.

पालिकेने घनकचरा संकलन करुन त्यावर प्रक्रिया करण्याच्या माध्यमातून शहराच्या बाहेर घनकचरा व्यवस्थापन केंद्र उभारले. त्यासाठी मशीनही घेण्यात आली.पण तीच मशीन चेक पालिकेच्या कचऱ्याच्या ढिकार्‍यावर गेल्या अनेक वर्षापासून पडून शेवटची घटका मोजत आहे. 

घनकचऱ्याचे व्यवस्थापन कुठे गेले की? हा कचरा पालिका प्रशासन रात्रीच्या अंधारात चक्क जाळून टाकण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.कधी कुजलेल्या कचऱ्याची दुर्गंधी तर कधी धुराचा त्रास रस्त्याहून ये-जा करणाऱ्या व मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या नागरिकांना होत आहे.

 

जिल्यातील काही पालिकेची मुदत संपून जवळपास दोन वर्षे संपली. त्यामुळे पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात गेला आहे.

 अनेक सफाई कर्मचारी पालिका कार्यालयात किंवा पालिकेच्या इतर विभागात काम करीत असल्याचे वास्तव चित्र निर्माण झाले आहे. यामुळे पालिकेमध्ये सावळा गोंधळ निर्माण झाला असून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना कोण अधिकारी अन् कोण कर्मचारी आहे हे समजणे अवघड झाले आहे. 

          *चौकट*

कंधार पालिकेतील सफाई कर्मचारी विविध भागात काम करत असल्याची माहिती उघडीस आली आहे सफाई कर्मचारी म्हणून नेमणूक असलेल्या कर्मचाऱ्यांना सफाईचे काम सुद्धा नियमबाह्य पद्धतीने पालिकेतील इतर विभागात काम देण्यात आले आहे त्यामुळे ते मूळ पदस्थापनेच्या जागी गैरहजर राहतात या अगोदर नगरपालिकेने वाट लावण्यासाठी घंटागाडी उपक्रम राबविला होता प्रत्यक्षात शहरातील बरेचसे भागात सध्या घंटागाडी कचरा देण्यासाठी आठ आठ दिवस दिसत नाही .

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरातील प्रत्येक दारावर लावलेले क्यू आर कोड साठी लाखाची उधळपट्टी करून लावले असून प्रत्यक्षात ते फक्त बिनकामाचे क्यू आर कोड झालेले दिसून येत आहे यामुळे नगरपालिकेने लाखो रुपयाची उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे

Share This Article
error: Content is protected !!