संपादक|अभिषेक बकेवाड
खऱ्या साधूची व्याख्या, जुनाट रूढी व परंपरा यावर महाराजांनी प्रबोधन….
हिमायतनगर – आनंद दत्तधाम आश्रम श्रीक्षेत्र माहूर येथील प्रसिद्ध राष्ट्रसंत ह.भ.प. साईनाथ महाराज वस्मातकर यांनी श्री.सचिन कळसे सर यांच्या गृहप्रवेश निमित्ताने हिमायतनगर येथे आले असताना गावातील नागरिकांना शिक्षण, व्यसनमुक्ती,कर्मकांड अशा विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. साईनाथ महाराजांची ही आगळीवेगळी ओळख सर्वांप्रती मोठ्या आदराची ठरली.
खऱ्या साधूची व्याख्या, जुनाट रूढी व परंपरा यावर महाराजांनी प्रबोधन केले. साईनाथ महाराजांची पादपुजा करून पुष्पहार,शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील भाविक भक्तांकडून साईनाथ महाराज यांच्यासह श्री .बबनराव जगाडे विभाग संघचालक संभाजीनगर, श्री.पुंडलिक श्रीसागर ,सौ.सुरेखा तळनकर,व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
ह.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांचे गोल्ला-गोलेवार यादव समाजाकडून अभिषेक बकेवाड (महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय यादव महासभा, नवी दिल्ली) यांनी सत्कार करून आशीर्वाद घेतला.