नांदेड प्रतिनिधी / अशोक वाघमारे
नांदेड – हिमायतनगर तालुक्यातील मोजे बोरगडी येथील वीज कोसळल्याने एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला आहे. बोरगडी येथील शेतकरी श्री दिगंबर लिंगना काईतवाड यांची म्हैस असून ती दिवसा दहा लिटरच्या जवळ दूध देत होती आणि त्या म्हशीची अंदाजीत किंमत एक लाखाच्या जवळ असून सदर महेश चरण्यासाठी शेतामध्ये खात होती त्यात अचानकपणे विजेच्या कडकड सह वाऱ्यामध्ये अचानकपणे बीज कोसळून एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला आहे.
दिगांबर काईतवाड रा.बोरगडी ता.हिमायतनगर गट न.174 दि.6/6/2024 रोजी बोरगडी येते पडली असुन सदर म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे पेरणीच्या दिवसांमध्ये मोठं नुकसान झाले आहे . शेतकरी शेतातील मशागती करून बी भरण्यासाठी मोठ्या तयारीला लागल्या असून असे निसर्गाने दुधाच्या म्हशीवर घाला घातल्याने शेतकरी मोठ्या संकटात असल्याचे दिसून आले आहे. म्हणून याकडे पशुवैद्यकीय अधिकारी झालेल्या घटनेच्या ठिकाणी पंचनामा करून सदर शेतकऱ्यांना मदत करण्याची अत्यंत गरज आहे.