हदगाव तालुक्यातील मौजे गारगव्हाण येथील मालकीच्या शेतातून जबरदस्तीने अधिकारी रस्ता मोकळा करण्याच्या सूचना देत आहे.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

संबधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन..

हदगाव ता.प्रतिनिधी/

हदगाव : तालुक्यातील मौजे गारगव्हाण येथील रहिवाशी असणारे शेतकरी कृष्णा गोपाळराव तांबारे व इतर शेतकरी असून यांची शेती मौजे गारगव्हाण येथे गट नंबर 141 असून सदरील शेतामधून रस्ता खुला करण्यात यावा अशा आशयाची नोटीस मंडळ अधिकारी यांनी दिनांक १०/०६/२०१३ रोजी देण्यात आली होती. यामध्ये शेतकरी म्हणत आहे की प्रत्यक्ष शेतामधून कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही टोच नकाशावर सुद्धा रस्त्याची नोंद नाही आतापर्यंत आमच्या शेत जमिनीमधून कोणीही रस्त्याने गेलेले नाही तरीही जाणून-बुजून आमच्या शेतजमीतून रस्ता काढत आहेत येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी सबंधित व्यक्तीकडून पैशाची देवाण घेवाण करून आमच्यावर अन्याय करीत आहेत. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन हदगाव येथील उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे..

 

Share This Article
error: Content is protected !!