हभप चैतन्य महाराज कंधारकर यांच्या धार्मिक कार्यक्रमांना काशी, अयोध्या आणि प्रयागराज येथे मोठा प्रतिसाद

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

उमरी प्रतिनिधी / उद्धव मामडे

उमरी:-श्रीसंत साधूराज महाराज यात्रा समिती गंगाखेड व कंधारकर महाराज समितीच्या वतीने परमपूज्य ह भ प गुरुवर्य चैतन्य महाराज कंधारकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 23 मे ते एक जून दरम्यान काढण्यात आलेल्या काशी, अयोध्या आणि प्रयागराज येथील धार्मिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

 

 दरम्यान रुद्रस्वाहाकार, श्री शिवलीलामृत व साधूवंशसुधा या चरित्र ग्रंथाचे पारायण, नामसंकीर्तन, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

 

 ह भ प चैतन्य महाराज कंधारकर यांच्या अमृतवाणीतून काल्याच्या कीर्तनाने धार्मिक महोत्सवाची सांगता झाली आहे. या प्रसंगी संजय रुद्रवार, शशिकांत पाटील, बालासाहेब लकेकर, राजू सलगरकर, संगम गंदेवार, बालाजी मेडेवार, बाळासाहेब पांडे व कमिटीच्या सर्व सदस्यांच्या अथक परिश्रमातून धार्मिक महोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडला. ह भ प गुरुवर्य चैतन्य महाराज कंधारकर हे गेल्या अनेक वर्षापासून कथा व किर्तन महोत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. दरवर्षी भारतातील एका तीर्थक्षेत्रावर कथेचे नियोजन करून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध करतात.

Share This Article
error: Content is protected !!