नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नांदेड – जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेतकरी व मजूर वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात नांदेड येथील सामाजिक वनीकरण विभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. सदर मोर्चा मध्ये शेतकऱ्यांच्या वृक्ष लागवडी व फळबाग योजनेसाठी शासनाकडून होत असलेली वेळ काढू पणा व जाणून बुजून शेतकऱ्यांच्या फायलींना मंजुरी न दिल्यामुळे आज दिनांक 10/ 6/ 2024 रोजी नांदेड येथील सामाजिक वनीकरण विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या गेल्या एक वर्षापासून फायली धूळ खात पडले असून त्याकडे शासनाचे मोठे दुर्लक्ष असल्याची दिसून आल्यामुळे. कॉम्रेड गणपतराव रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला आहे सदर मोर्चात विभागातील भ्रष्ट अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावी भ्रष्ट अधिकारी यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशी करण्यात याव्या शेतकऱ्यांच्या हक्काचे योजना आहे शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे शेतकऱ्यांच्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्या घेऊन सदर मोर्चा नांदेड सामाजिक वनीकरण विभागीय कार्यालयावर करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते अविनाश एटकापल्ले हंबर्डे, प्रकाश हंबर्डे, धसाडे मेळगावकर, दिगंबर जोंधळे, गजानन मारुती कानगुले, यासह शेकडो महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.