मुदखेडतालुका प्रतिनिधी/राहुल कोलते
मुदखेड : देशातील द्वितीय अग्रगण्य बँक ऑफ बडोदा चा 20 जुलै 2023 रोजी 116 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
या वर्धापन दिनाची सुरुवात करताना शाखेमध्ये सर्वप्रथम बँक ऑफ बडोदा चे फाउंडर श्री सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी म्हणून बँक ऑफ बडोदा दरवर्षी वर्धापनदिनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते या शुभ दिनाच्या साधून याही वर्षी बँक ऑफ बडोदा माळकौठा शाखेद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये माळकौठा येथील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा माळकौठा येथे सिलिंग फॅन चे वाटप करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी व त्यांच्या जडणघडणासाठी उत्तम असे मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या विविध कार्यक्रमास बँकेच्या ग्राहकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संपूर्ण कार्यक्रम बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. रविराज गुडमेवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तसेच या कार्यक्रमास जबाबदारीने पूर्ण करण्या स बँकेतील इतर कर्मचारी श्री. मधुकर कदम (शाखाधिकारी), प्रवीण आढाव (हेड कॅशियर), कमलाकर कोल्हे (लिपिक) इतर कर्मचारी माणिक जाधव, केशव पैलपार आणि बँक मित्र विनायक गाढे, योगेश माडेवार, शिवाजी शिंदे, राजू शिंदे गावातील सरपंच केशव तारू, उपसरपंच शहाजी जाधव गावातील सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.