खानदेशातील प्राचार्य किसनराव पाटील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वीरभद्र मिरेवाड यांना प्रदान….

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे )

नांदेड – महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,शाखा पाचोरा व प्राचार्य डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरा यांच्या माध्यमातून डॉ. किसनराव पाटील यांच्या स्मृतिदिनी हा पुरस्कार दिला जातो. त्याचे यावर्षी वितरण वाघोड तालुका रावेर या त्यांच्या जन्मगावी करण्यात आले .

स्वर्गीय किसन पाटील यांच्या नावाने दरवर्षी मराठी साहित्यात वेगळ्या साहित्य प्रकाराला हा पुरस्कार देण्यात येतो .यावर्षी बालसाहित्याला पुरस्कार देण्याचा निर्णय ज्ञानपरंपरेच्या निवड समितीने घेतला होता.

 

 त्यात नायगाव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक वीरभद्र मिरेवाड यांच्या ‘योद्धा’ या बालकादंबरीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रुपये रोख ,सन्मानपत्र ,सन्मान चिन्ह असे होते.

 

 हा पुरस्कार माजी शिक्षण उपसंचालक व जेष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते मिरेवाड यांना प्रदान करण्यात आला.

 यावेळी प्राचार्य भी. ना .पाटील ,समन्वयक

 डॉ.अशोक कौतिक कोळी ,डॉ. वासुदेव वले, डॉ.योगेश महाले, बंडू पाटील कदम ,डॉ. प्रकाश सपकाळे, डॉ. रवींद्र वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थानिक साहित्यिक प्रभाकर महाजन, अरविंद सुतार ,विजय लुल्हे यासह श्रीमती शोभा पाटील, मयूर पाटील, प्रवीण पाटील, ममता पाटील व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!