विरक्त वृत्तीचा परखडमताचा भला माणूस ” कै.नारायण सटवाजी वटपलवाड “

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रतिनिधी / अशोक वाघमारे 

नांदेड – नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील शेतकरी व एकत्रित कुटुंबात बालपण अतिशय स्वच्छंदी,गाई, म्हशीचे संगोपन करून दुध व्यवसायाची आवड.वयाच्या 18 ते 19 वर्षात विवाह.गावातील सायन्ना बकेवाड यांच्या संपन्न घराण्यातील सुशील सुंदर अनुसया ह्या प्रथम कन्येशी विवाह जुळला.संसारात अजिबात मन रमेना माहुर गडावर दत्त संप्रदायात आनंद गिरी महाराजांच्या सान्निध्यात गुरूमंत्र घेऊन संपूर्ण आयुष्य सचोटीने वागले.कांही दिवस मठात वास्तव्य करून परत स्वगृही परतले.अनासक्त संसारातील दोन बाळांचा जन्म कुटुंबाला आनंद व सुखाचा स्वानंद दाम्पत्याला व कुटुंबाला प्राप्त झाला.तीन भाऊ व एक बहीण यांच्या समवेत जय आई वडीलांच्या प्रेमाचा वर्षाव त्यांच्यावर बरसला.जीवनात सत्यता व निर्व्यसनी ह्यांना प्राधान्य दिले.गोपालन,निर्मळ व सुंदर शेती कष्टाने करून आत्मिक समाधानाची अनुभुती अनुभवली.मुलगा माधव गुरूजी अत्यंत बुद्धिमान , कर्तव्य दक्ष व आईवडीलाची मनोभावे सेवा करणारा मला लाभला हे माझं भाग्य आहे असं अनेकदा भावना आमच्यासमोर व्यक्त केल्या.मुलगी गावातच भुसलवाड परीवारातील ग्रामविकास अधिकारी शिवाजी परसराम भुसलवाड यांना दिली.त्यांचाही संसार सुखाचा पाहून खूप आनंदी होत असतं.कधी कधी मुलींच्या घरचा पाहुणचार घेऊन तृप्त होऊन येत.पती पत्नीचा सुसंवाद फारच बेताचा ठरला.वय वाढत गेले तसे आजार जवळ येत गेले.औषधोपचार करीत करीत जीवनप्रवास चालत असतानां रक्तदाब वाढला व हार्ट सर्जरी करण्याचा दुर्धर प्रसंग ओढवला.तेव्हापासूनच आरोग्य बिघडत गेलं.तीन दिवसांपासून झोप येत नसे जेवण अपचन झाले.आज दुपारी तीन परलोकात गेली.अशा सचोटीच्या भल्या माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली.

शोकाकुल आदरांजली.रूद्रवाड बरबडा.

Share This Article
error: Content is protected !!