तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी झाल्याने नायगाव शहरांमध्ये मोठ्या उत्साहात जल्लोष

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे 

नांदेड -नायगाव येथे सायंकाळी साडेसात वाजता नायगाव शहर येथे भारतीय जनता पार्टी व महायुती सरकार स्थापन झाल्याने मा.ना.श्री. नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान पदाची तिसरी वेळेस शपथ घेतल्याने या आनंद उत्साहात नायगाव शहरांमध्ये बँड फटाके पेढे वाटत जल्लोष करत तसेच .

 

सलग तिसऱ्यांदा भारत देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी देशाने परत एकदा आपल्या खांद्यावर दिली आहे.. भारतासारख्या बहुभाषिक,बहुप्रांतीक व बहुपक्षीय देशात आपल्या सारखं राष्ट्राभिमानी,कणखर व राष्ट्रसमर्पित व्यक्तीमत्व सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेत असतानाचा क्षण हा समस्त देशवासीयांसाठी अभियानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. गेली दहा वर्षात आपल्या नेतृत्वाखाली राष्ट्रप्रथम याच भावनेतून सर्वानाच सोबत घेऊन आपण चालवत असलेला देशाचा हा विकास रथ अजूनही असाच पुढे पुढे घेवु जा.. संपूर्ण जगात भारत देशाचा गौरव आपण वाढवला आहात.ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.. यापुढेही आपल्या देशाचा गौरव असाच वाढत राहो आणि आपल्या हातून या भारतमातेची सेवा सदैव अशीच घडत राहो हीच सदिच्छा नायगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व भारतीय बांधव करत आहेत .

 

 शुभेच्छा देत संपूर्ण देश आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा होता, आहे आणि यापुढेही सदैव असाच पाठीशी राहील  अशी आशा व्यक्त गजानन पाटील चव्हाण यांनी केले .

तसेच जल्लोष करत असताना उपस्थित माजी शिक्षण सभापती शिवराज पा होटाळकर, नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजनान पाटिल चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष दत्ता पा ढगे. राजू पा जाधव, प्रदीप पा पवळे, शिवजी पा शिंदे, माधव पा उपसे, रवी पा पवळे, पावन भूताले, योगेश पाटील पवळे, शेषेराव शेटकर, शमी शेख, विठ्ठल बोरीकर माधव कार्लेकर सह 

भारतीय जनता पार्टी महायुती नायगाव तालूका व शहरातील सर्व भाजपा महायुती पदाधिकारी कार्यकर्ते सह मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share This Article
error: Content is protected !!