शिवसेना(उद्धव )धर्माबाद तालुक्याच्या वतीने भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रतीमेस जोडो मारो आंदोलन!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड : शिवसेना(उद्धव )धर्माबाद तालुक्याच्या वतीने किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्र भर फिरत असुन देशात आणि जगात महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारा हा व्हिडिओ असुन किरीट सोमय्या हा एक विकृत स्वभावाचा माणूस आहे.

किरीट सोमय्याच्या या व्हिडिओ मुळे तमाम महाराष्ट्रीयन माणसांची मान खाली गेली आहे. यांचा निषेध करण्यासाठी दि.18 जुलै 2023 रोजी टिक 11:30 वाजता हुतात्मा गोविंदराव पानसरे चौक येथे किरीट सोमय्या च्या जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक गणपतराव कात्रे,गणेश गिरी उपजिल्हाप्रमुख, विधानसभा संघटक शिवराज पाटील मोकलीकर,तालुका प्रमुख रामचंद्र रेड्डी,शहर प्रमुख बालाजी बनसोडे,तालुका संघटक मारोती कागेरू,विठ्ठल हाडपे,शेखर कमलाकर,अशोक दारमोड, मोहन पांचाळ,राजु शिरामने,विरभद्र वारले आदींची उपस्थिती होती.

Share This Article
error: Content is protected !!