हुस्सा येथील माती माफीयांनी महसूल प्रशासनाच्या नाकावर ठेचून अवैद्य पणे हजारो ब्रास माती उत्खन केले आहे….

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे 

नांदेड – नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कल अंतर्गत येणाऱ्या मौजे हुस्सा येथील दोन वीट भट्टी चालकांनी अवैध पणे माती उत्खन केले आहे. सदर माती उत्खन हे वीट भट्टी साठी केली असून यात कुठल्याच प्रकारची परवानगी न करता आणि महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी मिली भगत करून हजारो ब्रास माती उत्खन केले आहे.

       सदर माती उत्खन हुस्सा येथील गट क्रमांक 31 मधून जगन्नाथ गंगाधर हंबर्डे व गट क्रमांक 585 मधील शिवाजी अर्जुन हंबर्डे यांनी वीट भट्टी साठी विनापरवाना अवैध पणे मोठ्या प्रमाणात भरमसाठ राजरोषपने माती उत्खनन केली आहे. याकडे मात्र महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे महसूल प्रशासनातील स्थानिक कर्मचारी यांनी माती माफियाकडून मिली भगत करत व आर्थिक तरतुदी करून माफी माफीयांना चांगलाच आशीर्वाद देत असल्याची चर्चा होताना दिसून येत आहे. हुस्सा येतील दोन ते तीन विट्ट भट्या हे विनापरवाना चालत असून याकडे मात्र शासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. व शासनानेच यांना चांगला आशीर्वाद देत असल्याने हे विनापरवाना वीट भट्ट्या चालत असल्याची चर्चा हुस्सा व राहेर परिसरामध्ये होताना दिसून येत आहे. सदर अवैध माती उत्खननामुळे हुस्सा येथील गोदावरी नदीचे सौंदर्य संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. व गोदावरी नदीचे सापळे निघाल्याचे देखील चित्र दिसून येत आहे. अवैध माती उत्खननामुळे रस्त्याचा देखील मोठ्या प्रमाणात सपना चोर होताना दिसून येत आहे व नवीन झालेल्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात तडे व खडे पडत आहे. अवजड वाहतुकीमुळे नव्याने तयार झालेल्या रस्ते मात्र खुळखुळ होत असून याकडे शासनाने त्वरित पंचनामे करून व संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व अवैद्यपणे माती उत्खन करणाऱ्या फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरत आहे.

Share This Article
error: Content is protected !!