नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नांदेड – उमरी तालुक्यातील बळेगाव येथील नदीकाठ पासून काही अंतरावर रेतीचा शासकीय रेतीघाट निघाला असून घरकुलधारकांना मोफत रेती देण्यासाठी हा शासकीय रेतीघाट सुरू करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी नांदेड व तहसीलदार उमरी यांनी शासकीय घाटावर काही नियम लावून दिली असून त्या नियमाप्रमाणे न चालता आपल्याच पद्धतीने कारभार सुरू झाला असून येथे नऊ तारखेपर्यंत जास्तीचे टिपर व दोन जेसीबीच्या साह्याने रेती उपसा करून रेतीचा स्टाफ केला. असून हजारो ब्रास रेती हे स्टॉक करून ठेवले आहे .त्यामुळे रेती घाटातला नियम लावून दिले असतील त्यांनी नियमाचे उल्लंघन करण्यात आले असून सदर रेती उपसा करून घरकुलधारकांना देण्यात येणार होती मात्र सदर गुत्तेदाराने रेती स्टॉक करून ठेवून नंतर रेतीवाटप करण्यात येईल असे सांगण्यात आले त्यामुळे काही घरकुलधारकाचे घर बांधकाम रोखले आहे. अशी माहिती ही नागरिकांनी यावेळी दिली शासकीय रेती घाटावरून संबंध दोन्ही तालुके नायगाव ,उमरी,धर्माबाद यांनाही घरकुलधारकांना रेती मिळणार आहे. मात्र ह्या रेतीचे नियम लावून दिले प्रमाणे नसून मनमानीप्रमाणे होत असल्याचे नागरिकांत बोलल्या जात आहे . सदर रेती घाट हा हजारो ब्रास वाळू वाहतूक उत्खनन करून स्टॉक केल्याने हे नियमबाह्य उत्खनन झाल्याची ही नागरिकातून बोलल्य जात आहे.