महाराष्ट्र मुद्रण परिषदेची नूतन कार्यकारीणी जाहिर मराठवाडा विभागीय संघटकपदी भुमन्ना आक्केमवाड यांची निवड.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

महाराष्ट्र मुद्रण परिषदेत नांदेडचे योगदान मोलाचे…

नांदेड जिल्हा मुद्रक संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष ते  मराठवाडा विभागीय संघटक या पदावर नियुक्ती.

नांदेड प्रतिनिधी/

नांदेड : महाराष्ट्र मुद्रण परीषदची २०२४-२५ या वर्षातील कार्यकारिणीची पहिली सभा शुक्रवार १४ जून २४ रोजी ऑटो क्लस्टर एक्सिबिशन सेंटर पुणे येथे परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यावेळी म मु प चे कोष्याध्यक्ष किशोर गोरखे, सरचिटणीस नागेश शेंडगे, विलास सांगुर्डेकर, रवींद्र जोशी, केशवराव तुप्पे, मनोज बनकर, धारगळकर, गुरूखुद्दे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यकारीणी सभेत महत्वाच्या विषयावर चर्चा करून कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला.
या कार्यकारीणी निवडीत नांदेड जिल्हा मुद्रक संघाचे माजी अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांना मराठ वाडा विभागीय संघटक या पदावर स्थान देण्यात आले आहे. विविध सामाजिक, राजकीय व व्यवसाय क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ यशस्वी कार्य केलेले आहे.

महाराष्ट्र मुद्रण परिषदेत नांदेडचे योगदान मोलाचे आहे. स्व.ग.ना.अंबेकर,स्व.प्रल्हाद साहनी, स्व. रविंद्र रसाळ, स्व. किशनराव बोडखे, स्व. बालाजीराव मामिडवार, सतीश कुलकर्णी, नंदकुमार केशटवार,प्राचार्य चंद्रकांत पोतदार,उल्हास महाजन,दिलीप पेडगुलवार, देवदत्त देशपांडे, श्रीहरी निलावार, संतोष मुगटकर,सय्यद मौला इ. मान्यवरांनी मुद्रण परिषदेत महत्वाची भुमिका बजावली आहे.

या निवडीचे नांदेड जिल्हा मुद्रक संघाचे म. अय्युब, प्रशांत बोडखे, भारत गट्टेवार, प्रशांत गुर्जर, अतूल भुरेवार, शिवानंद सुरकुटवार, अ. वहाब, आनंद नादरे,समीर कुलकर्णी,शिवाजी कोनापुरे,किशन देशमुख, गणेश लोखंडे, मारोती लकडे, अ.रज्जाक, सदानंद देशमुख तसेच सर्व पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन कऱण्यात आले.

Share This Article
error: Content is protected !!