मुदखेड प्रतिनिधी/ राहुल कोलते
मुदखेड दि.१६ जुन तिरुपती उर्फ किरण रामचंद्र लांडगे वय वर्ष २४ रा. मांडवी ता. नायगाव येथील रहिवासी असून काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कामाला पुण्याला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला या अगोदर एमआयडीसी कृष्णर येथे कंपनीत कामाला होता. मनोज जरांगे पाटील यांचा तो कट्टर समर्थक होता. या अगोदर विविध मोर्चामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. एवढे शिकून नोकरी मिळत नसल्यामुळे. *मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे* काल रात्री सुमारे ८ च्या दरम्यान येळी-महाटी पुलावरून गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सोबत घेऊन आलेली बॅग हे पुलावर भेटली असून हा युवक नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्या आहे असा अंदाज व्यक्त केला गेला होता. पुलाच्या दोन्ही साईडने शोध घेतले असता मुदखेड तालुक्याच्या हद्दीत सापडला आहे.
त्यावेळी घटनास्थळी मुदखेड पोलीस स्टेशनचे पी.आय. सप्रे साहेब,पोलीस उपनिरीक्षक शिंदे साहेब, पो. हे.कॉ. पवार साहेब, पो.हे.कॉ. शिंदे साहेब, उस्माननगर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. पवार साहेब, गाडेकर साहेब, येळी येथील सरपंच भगवान पाटील सोमवारे, आनंद लांडगे, महाटी येथील सरपंच बळी पाटील ढगे, पोलीस पाटील आदिनाथ ढगे, मांडणी येथील गावकरी विश्वंभर पाटील लांडगे, तिरुपती लांडगे, देवानंद ताटे, बाळू लांडगे, माणिक लांडगे सर्व गावकरी मंडळीचं आरक्षण न मिळाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे असे बोलत होते. त्यांचा मृतदेह मुदखेड येथील शासकीय दवाखान्यात पाठवण्यात आला आहे.