वादळीवारे अन विजाच्या कडकडाटासह पावसाची हजेरी,

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

वादळीवारे अन विजाच्या कडकडाटासह पावसाची हजेरी,
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची गजानन चव्हाण यांनी घेतली भेट, शेतकऱ्यांना मोबदला देण्याची केली मागणी.

नायगाव प्रतिनिधी / अशोक वाघमारे

नायगाव – सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत नायगाव तालुक्यातील परिसरात पावसाची हजेरी लागली आहे. पावसासह परिसरात विजा मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत. वारे वेगाने वाहत असून त्यांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. नायगाव परिसरात दिनांक 16 जून 2024 रोजी सायंकाळी साडेनऊ वाजता अचानक वादळी वारे सुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळं कुटुंब उघड्यावर पडले आहे.
नायगाव तालुका व शहरासह अनेक गावामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. शेतकरी बांधव यांनी पेरणीसाठी आणलेले खत बियाणे व खाण्याचे घरगुती सर्व सामान अशा प्रकारचे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहेत अनेक शेतातील झाडे, पोल पडणे व घरावरचे पत्रे उडणे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान झाले आहे. या सर्व बाबीची संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकरी बांधवाचे झालेली नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना आणि घरगुती लोकांना अर्थिक मदत द्यावीआहे.
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी, पोलीस निरीक्षक नायगाव मारुती मुंडे साहेब, हणमंत गंधपवार, बाबू चलकुलवर, नायगाव पोलीस स्टेशनचे सह संबंधित कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!