प्रति पंढरपूर असलेल्या मंदिर परिसरात वृक्षांची लागवड

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

 

नायगाव  प्रतिनिधी/अशोक वाघमारे 

 नायगाव – तालुक्यातील रुई(बु.) टी पॉईंट येथे स्थापन करण्यात आलेल्या मंदिराच्या ठिकाणी जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले होते, याठिकाणी पिण्यासाठी पाणि नसायचे,चोऱ्या व्हायच्या आशा जंगलाच्या जागेला बालब्रम्हचारी धर्मगुरू श्री.हरिओम गिरीजी बाबा यांनी त्याठिकाणी क्षेत्रसिद्ध प्रति पंढरपूर संस्थानची स्थापना करून नंदनवन तयार करण्यासाठी मंदिर परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली आहे. 

             यावर्षी एक हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला असून त्याअनुषंगाने आज दि.१८ जून २०२४ रोजी भाजपचे नेते रावसाहेब पाटील बेलकर ,माजी सरपंच अशोक पाटील बेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध प्रकारच्या शेकडो वृक्षांची लागवड केली आहे.अजून शिल्लक राहिलेले वृक्षांची लागवड करायची आहे. तरी इच्छुकांनी सढळ हाताने दर्जेदार वृक्षांची मंदिरास वृक्षभेट देण्याचे आवाहन बालब्रम्हचारी धर्मगुरू श्री.हरिओम गिरीजी बाबा यांनी केले आहे.

 

           यावेळी बालब्रम्हचारी धर्मगुरू श्री.हरिओम गिरीजी बाबा ,भाजपाचे युवामोर्चा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब पाटील बेलकर ,माजी सरपंच अशोकराव पाटील बेलकर, आनंदराव पाटील यंडाळकर ,लक्ष्मण इंगळे जारीकोट ,रामजी पाटील ईळेगावकर , रावसाहेब पाटील जीगळे रुईकर, श्रीराम पाटील रुईकर, काळे बाबा, बाबुराव कांबळे रुईकर आदींच्या उपस्थितीत वृक्षांची लागवड करण्यात आले.

Share This Article
error: Content is protected !!