उमरी तालुका प्रतिनीधी/ उद्धव मामडे
उमरी – तालुक्यातील मौ.धानोरा बु.येथे विविध ठिकाणी टाकण्याचा बहाना करून हजारो ब्रास मुरूम उत्खनन करुन महसूल प्रशासनास धुळ चारत असल्याच चित्र दिसून येत आहे, महसूल विभाग कारवाई का? करत नाहीत यात मिलीभगत झाली का? अशी चर्चा सुज्ञ नागरिकांतून होत आहे. सदर,गेली जवळपास आठ दहा दिवसांपासून दिवसरात्र अवैध मुरूमाची व व्हळाची (छोटा नदी) वाळुची वाहतूक होत आहे, यात बाहेर गावचा गुत्तेदार,दलाल मात्र मालामाल, यात अवैध उत्खनन करणाऱ्याचे अच्छे दिन धानोरा बु.येथे मुरूम उत्खनन वाहतूकीसाठी शासनाकडून वाहतूकी साठी परवानगी दिली नसली तरी सरास भर दिवसा हजारो ब्रास मुरूम धानोरा बु.गावातून भर चौकातून प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे की देवाण घेवाणामुळे का? अवैध वाहतूक होण्याचे चित्र दिसत आहे.धानोरा बु.येथे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाहतूक केली जाते यात महसूल विभाग मिलीभगत आहे का ? फोन केल तर अधिकारी नॉट रिचेबल असे जनतेतून हलक्या आवाजातून बोलल्या जात आहे. उमरी महसुल प्रशासनाच्या डोळ्यावर कोणती पट्टी लावली आहे.
प्रशासनाच्या सहकार्यामुळे भर दिवसा व्हळाची वाळु ,अवैध मुरूमाची सरास होते,विविध ठिकाणावर टाकतो परवाना घेऊन हजारो ब्रास मुरूम ट्रॅक्टर द्वारे दुसऱ्याच्या घराचा पाया भरण्यासाठी असा गोरख धंदा चालु आहे,याची विचारपूस सुज्ञ केली असता गुत्तेदार मात्र मि सर्वाना हप्ता देतो म्हणतो तुम्ही कोन म्हणणार उद्धट भाषेत बोलतो,याला पाठबळ कोनाचा अस बोलल्या जात.
या अवैध,वाळु,मुरूमाची उत्खनन करण्यास प्रशासन आळा घालेल का? कि आदा तेरा आदा मेरा अशी चर्चा नागरिकांतून होत आहे. गावालगत असलेला माळरान कोरून कोरून पुढील शेतकऱ्यांची वाट लावलेली दिसतेय काही शेतकरी मलिदा घेऊन गप्प तर काही आपली जमीन कोरत आहेत म्हणून संतप्त यात शासनास काही फरक पडत नाही अस दिसुन येतो म्हणून अवैध मुरूम उत्खनन तात्काळ बंद करुन जेसीबी,तिन ट्रॅक्टर ताब्यात घेऊन कारवाई करतील का अशी चर्चा नागरिकांतून दिसून येत होती मात्र तस काही घडल नाही, महसूल विभागाची कारवाई गुलदस्त्यातच महसूल विभाग मिलीभगत झाली का?धानोरा बु. येथे ह्याच चर्चेला उधाण आला आहे.