उमरी घरकुल धारकांना ठेकेदार गावकऱ्यांच्या भांडणात वाळू मिळेना…

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

घरकुल लाभार्थीच्या सेतू केंद्रावर वाळू परवानासाठी रांगच राग

उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे

उमरी – तालुक्यात रेती स्टॉक रिलीज न केल्यामुळे लाभार्थीना चार पाच दिवसांपासून शेतीची कामे सोडून वाळू परवानासाठी सेतू केंद्रावर ताटकळत बसण्याची पाळी आल्याने घरकुल लाभार्थीमध्ये प्रशासना बाबतीत संतापाची लाट निर्माण झालेली दिसून आली.यात काही लाभार्थीनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘साहेब आम्ही गरीब घरकुल लाभार्थी आहोत.आम्ही उमरी येथील सेतू केंद्रावर वाळू परवानासाठी गेलो, दोन दिवसांपासून फिरत आहोत.शहर व तालुक्यातील घरकुलधारकांना शासनाकडून पाच ब्रास मोफत देण्याचा निर्णय घेण्यात वाळू मिळावी म्हणून घरकुल धारक ऑनलाईन करुन पावती काढुन पैसे जमा करुन देखील गेल्या आठ दिवसांपासून वाळू डेपोवर वाळू ठेकेदार वाहनधारक व गावक-यांच्या भानगडी चालू असून यांच्या भांडण तंटयात कांही रिकाम टेकडे धिंगाणा घालून वाळू दर एकतासला डेपो बंद पाडत असल्याने घरकुल धारकांनी डेपोत पैसे देऊन सुध्दा दिवसभर थांबून वाळू मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

 

दररोज डेपोवर वाळू ठेकेदार गावकरी व गुंडगिरी करणा-रात दररोज वाद होत असून तहसीलदारांचे याकडे दुर्लक्ष होत आहे घरकुल धारकांनी मे महिन्यात पावत्या काढल्या त्या ऑनलाईन पावत्यांची पंधरा दिवसांची मुदत संपत आहे तरी देखील वाळू मिळेना. वाळू डेपोत दररोज गाड्या भरण्यावरुन भानगडी चालू असून मंडळ अधिकारी तलाठी घरकुल धारकांना वाळू मिळत नसल्याने कामे खोळंबली असून याकडे महसूल विभागाने लक्ष देऊन घरकुल धारकांना वाळू वाटप करावी मागणी होत आहे.वाळु डेपोवर घरकुल धारकांना वाटप करण्यासाठी वाळू जमा करून ठेवण्यात आली मात्र कांही वाहन धारक आमच्या गाडया अगोदर भरुन दया म्हणून भानगडी करीत असून या भानगडीत वाळू डेपो घण्टया दोन घंण्टयात बंद होत आहे. बळेगाव रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा असुन डेपोवर दररोजच्या वादामुळे नाहक घरकुल धारकांना त्रास होत आहे.याकडे महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

 

शासन गोरगरीब घरकुल धारकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी, असे धोरण राबवत असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाचेच अधिकारी घरकुल धारकांना वाळू मिळू नये,अशी व्यूहरचना करत आहेत.यामुळे मागीन दोन दिवसांपासून लाभार्थीना वाळू मिळाली नाही.ऑनलाइन वाळूची नोंदणी करून दोन दिवसांपासून उमरी तालुक्यातील बळेगाव डेपोत ताटकळत बसावे लागल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

 

उमरी तालुक्यातील शहरी व ग्रामीण

भागातील घरकुल लाभार्थींना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचे घोषित करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तालुक्यातील बळेगाव येथे डेपो सुरू करण्यात आला. परंतु, बुधवार व गुरुवार या दोन दिवशी बळेगाव डेपो आम्हाला परवान्यासाठी बळेगाव येथील स्टॉक रिलीज करा’ अशी विनवणी केली असता येथील वरिष्ठ अधिकारी यांनी घरकुल लाभार्थीसाठी स्टॉक रिलीज न करता चढ्या भावाने वाळूची खरेदी करणाऱ्यांना स्टॉक रिलीज न केल्याने घरकुल लाभार्थीमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.

 

याकडे प्रशासन व आमदार यांनी तात्काळ लक्ष देऊन घरकुल धारकांना वाळू मिळुन द्यावेत अशी मागणी करीत आहेत.

Share This Article
error: Content is protected !!