आमदार राजेश पवार यांच्या जनता दरबाराला प्रचंड प्रतिसाद!

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

न.पा. कार्यकक्षेतील प्रलंबित विविध विषयावर चर्चा व लवकरच उपाय योजना!

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील धर्माबाद नगरपालिका कार्यकक्षेतील नागरिकांच्या प्रशासकीय व विविध समस्येच्या बाबतीत आमदार राजेश पवार यांनी काल नगरपालिका सभागृहात जनता दरबार भरविला होता.या दरबारास नगरपालिका कार्यकक्षेतील जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून शासन व प्रशासन स्तरावर नागरिकांच्या विविध समस्या ऐकून उपाययोजना कधी व कशा कराव्यात या संदर्भात आमदार राजेश पवार यांनी प्रशासनास कोंडीत पकडल्यामुळे उपस्थित शेकडो नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते.

सदरील जनता दरबारास दस्तुरखुद आमदार राजेश पवार, माजी जिल्हा परिषद तथा स्थायी सदस्या व भाजपा महिला आघाडीच्या नांदेड दक्षिणच्या जिल्हा अध्यक्षा सौ.पुनमताई पवार,उपविभागीय अधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे, तहसीलदार महिंद्रकर, नगरपालिका मुख्याधिकारी सतीश पुदाके,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राम गलधर,नरवाडे,माळी,विज वितरण कंपनीचे अभियंता,भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी,नगरपालिकेचे विविध विभागाचे विभाग प्रमुख,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक डॉक्टर कमल किशोर काकांणी,वर्णी नागभूषण,भाजपाचे तालुका अध्यक्ष विजय डांगे,शहराध्यक्ष रमेश अण्णा गौड,औद्योगिक वसाहत धर्माबादचे माजी अध्यक्ष तथा माहेश्वरी समाजाचे प्रमुख कमलशेठ राठी,विविध पक्षांचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते व शेकडोंच्या संख्येत धर्माबाद नगरपालिका कार्यकक्षेतील तक्रार कर्ते स्त्रिया व पुरुषांचा मोठा सहभाग होता.

रस्ते,नाली,वीज,स्वच्छता यासह नगरपालिकेले अचानक थांबवलेल्या अतिक्रमित घरावरील सेवाशुल्क, नगरपालिकेचे संलग्नित असलेल्या बचत गटाचा समस्या, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयची बनलेली शोभेची वास्तु,नगरपालिका अंतर्गत विविध प्रभागातील न झालेला विकास व त्यावरील उपाय योजना कार्यालयीन कागदपत्राची होणारी दिरंगाई, यासह विविध विषय हाताळले गेले उपरोक्त प्रश्नाच्या अनुषंगाने उपस्थित सर्वांसक्षम विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या प्रश्नांना आमदार राजेश पवार यांच्यासमोर जनतेला उत्तर देताना भंबेरी उडाली होती.

    धर्माबाद नगरपालिका कार्यकक्षेत सर्वात जास्त तक्रारीचा पाऊस मालमत्तेची रजिस्ट्री न होणे,दस्त नोंद न होणे या संदर्भातल्या होत्या त्या अनुषंगाने गावठाण प्रमाणपत्र मिळणे ते मिळत नसेल तर दाट वस्ती प्रमाणपत्र कशा प्रकारे मिळेल,ज्या मालमत्तेच्या रजिस्टर आहेत पण सात बाऱ्यावर त्या मालमत्तेची नोंद अद्याप झाली नाही त्याच सर्वे नंबर मधील नंतर घेतलेल्या मालमत्ता सातबारावर आल्या पण अगोदरच्या का नाही? यावर सांगोपांग चर्चा झाली व त्यावर उपविभागीय अधिकारी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून सदरील प्रश्नाचा कायमचा निकाल अधिवेशनानंतर लावल्या जाईल अशी हमी आमदार राजेश पवार यांनी दिली.कार्यक्रमाचे आभार प्रशासकीय उपविभागीय अधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे यांनी मांडले आहे.

    धर्माबाद नगरपालिका स्थापनेपासून पहिल्यांदाच नगरपालिका कार्य कक्षेतील विविध विषयांच्या समस्यांचा लेखाजोखा प्रश्नोत्तरी व उपाययोजना अशा संदर्भाचा जनता दरबार इतिहासात पहिल्यांदाच झाला असून जनता दरबारात आलेले सर्व जनता एकंदरीत खुश होऊन अशा प्रतिक्रिया देत बाहेर पडल्या होत्या.

Share This Article
error: Content is protected !!