नांदेड उत्तर, दक्षिण, व भोकर विधानसभा यापैकी एका ठिकाणी उमेदवारी देण्याची मागणी
जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड- नांदेड तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा गावातून वंचित बहुजन आघाडीचे ग्रामपंचायत पॅनल निवडून आणणारे जिल्ह्यातील एकमेव कार्यकर्ते एकनाथ बत्तलवाड ब्राह्मणवाडेकर यांनी रविवारी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीमध्ये नूतन पक्ष निरीक्षक म्हणून नांदेड येथे आलेल्या सर्वजित बनसोडे यांच्याकडे नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण अथवा भोकर विधानसभा मतदार संघातून पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीत गत 20 वर्षांपासून एकनाथ बत्तलवाड हे कार्यरत आहेत. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर, ओबीसी मतदार जवळपास 2 लाखाच्या जवळपास आहेत. नांदेड दक्षिण विधानसभेमध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. तसेच भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये यादव-गोलेवार समाज मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास तिन्ही मतदारसंघामध्ये बत्तलवाड यांनी अनेक आंदोलने, आमरण उपोषण लोकहितार्थ करून अनेक लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात लोकहितार्थ त्यांचे अनेक उपोषणे झाले आहेत.
न्याय मिळेपर्यंत लढणारा कार्यकर्ता आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे वंचित, शोषितांसाठी अनेकांसाठी योगदान आहे. गेल्या लोकसभेला, विधानसभेला व यावर्षीच्या लोकसभेला गावातून बहुजन वंचितच्या उमेदवाराला जवळपास चारशेच्या वर मतदान आहे. ब्राह्मणवाडा गावात वंचितच्या पॅनलवर त्यांची पत्नी विद्यमान उपसरपंच आहेत.
या सर्व बाबींचा विचार करून नांदेड उत्तर, दक्षिण अथवा भोकर विधानसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडी पक्षाने एकनाथ बत्तलवाड ब्राह्मणवाडेकर यांनी उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात आहे, गोल्ला गोलेवार यादव समाजातील ज्येष्ठ समाजसेवक आहे उमेदवारी मिळाली तर समाज बांधव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे.