••सर्वपक्षीय बाभळी बंधारा कृती समितीच्या बैठकीत एकमुखी सूर!••
उपसा जलसिंचन योजना चालू करा किंवा कोलंबीच्या धरतीवर बाबळी लिफ्ट योजना द्या!
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.21. जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील बहूचर्चीत बाभळी बंधारा लोकार्पण होऊन दशकपूर्तीकडे वाटचाल चालू झाली असून बाबळी बंधाऱ्याच्या पाण्याचा आतापर्यंतही वापर झाला नाही.
तद्वतच धर्माबाद शहरासह तालुक्यातील विविध विकास कामे अद्यापही प्रलंबितच आहेत. त्या पार्श्वभूमीवर मराठवाडा मुक्ती दिनाच्या म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी धर्माबाद मध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा म्हणजेच एल्गार करण्याचा एकमुखी सूर सर्वपक्षीय बैठकीत निघाला.
येत्या 29 ऑक्टोबरला बाभळी बंधाऱ्याच्या निर्मितीला व लोकार्पणाला दहा वर्षे पूर्ण झाली असून 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 75 वर्ष म्हणजेच सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करीत आहे.
त्या पार्श्वभूमीवर बाभळी बंधारा कृती समिती व मराठवाडा जनता परिषदेतर्फे आज मार्केट समितीच्या बाजार समितीच्या सभागृहामध्ये सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. व त्या बैठकीमध्ये विविध विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.
सदरील बैठकीचे अध्यक्ष हे मराठवाडा जनता परिषदेचे मराठवाडा प्रांत अध्यक्ष गणेशराव पाटील करखेलीकर,प्रमुख पाहुणे म्हणून बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशनगावकर,धर्माबाद तालुक्याच्या विकासाचे जनक तथा विकासाच्या बाबतीत तीव्र आंदोलन सुरुवातीपासून छेडणारे बाभळी बंधारा कृती समितीचे सचिव डॉ.बालाजी कोम्पलवार कार्यालयीन सचिव तथा जेष्ठ पत्रकार जी.पी.मिसाळे,काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा कमिटीचे सदस्य वर्णी नागभूषण,भाजपाचे तालुका अध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार, शिवसेनेचे जिल्हा संघटक गणेश गिरी,काँग्रेसचे शहराध्यक्ष ताहेर पठाण,बाजार समितीचे संचालक शिवाजी पाटील, भाजपाचे नगरसेवक संजय पवार,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष रामचंद्र रेड्डी,भारत राष्ट्र समितीचे सक्रिय कार्यकर्ते प्रवीण पाटील बंन्नाळीकर,वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गौतम देवके, शिवसेनेचे बाजार समितीचे संचालक शिवाभाऊ मोकलीकर, जाणकार व्यक्तिमत्व प्रा.मिरकुटे,धर्माबाद नगरपालिकेचे माजी सभापती सखाराम निलावार,शंकर पाटील राजुरे,नगरसेवक प्रतिनिधी तथा पत्रकार सुधाकर जाधव,बाजार समितीचे संचालक दत्ताहरी आवरे,पत्रकार सतीश शिंदे, नारायण सोनटक्के, नागनाथ माळगे, चंद्रभिम हौजेकर, तुकाराम पाटील सर,प्राध्यापक टाकळे,बाजार समितीचे संचालक आनंद शिंदे,माजी संचालक गोविंद पाटील सोनटक्के, दैनिक देशोन्नतीचे पत्रकार संजय कदम यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकात बाभळी बंधारा कृती समितीचे सहसचिव जी.पी.मिसाळे यांनी सादरील बैठकीच्या आयोजना संदर्भात सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. नंतर प्रा. डॉ. बालाजी कोम्पलवार यांनी बाबळी बंधारा दशकपूर्ती व मराठवाडा मुक्ती संग्रामाचा सुवर्ण महोत्सव यासंदर्भात आपल्याला संयुक्तपणे एखादा कार्यक्रम घेता येतो का? व त्यासंदर्भात एखादा विशेषांक काढून धर्माबाद शहर व तालुका व्हिजन 2050 कसे असेल या संदर्भात माहिती देत आज घडीला विकासाच्या संकल्पना बदलल्या, विकासाचे मॉडेल बदलले, धर्माबाद काल कसे होते, आज कसे आहे,व उद्या कसे असणार या संदर्भात सर्वपक्षीय बैठकीमध्ये सर्वांच्या प्रतिक्रिया व योगदान हवे असल्याचे सांगत आज घडीला महाराष्ट्र व केंद्रशासन हे गतिमान झालेले आहेत याची कबुली दिली तर नंतर बाभळी बंधाऱ्याचा पाण्याचा आपण वापर केला का? हा प्रश्न विचारत पाण्याचा वापर न करण्याचे कारण हे शासन व प्रशासनाचे निष्क्रियतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन करीत बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याच्या विनियोगा संदर्भात सहकार तत्वावर चालणाऱ्या बाभळी, कुंडलवारी व दिग्रस आदी ठिकाणच्या लिफ्ट इरिगेशन योजना चालू करा व बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याच्या संदर्भात एक मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी तेलंगानात सोडण्याची अट शिथिल करा ही मागणी लावून धरण्यासाठी दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली पाहिजे याचा आग्रह धरला. आणि सरते शेवटी लिफ्ट इरिगेशन योजना चालू करा किंवा कोलंबीच्या धरतीवर बाभळीला एक नवीन लिफ्ट योजना द्या अशी मागणी करीत 29 ऑक्टोबर हा शासन व प्रशासनाला शेवटचा अल्टिमेट असेल तद्नंतर धर्माबाद तालुक्यात बाभळी बंधारा व इतर प्रश्नासंदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी उपस्थितांपैकी तब्बल वीस विविध पक्षांच्या लोकांनी आपले मनोगत मांडत वेगवेगळ्या समस्या व त्यावर उपाययोजना यासंदर्भात अभिव्यक्ती केली.
धर्माबाद शहर व तालुक्याच्या प्रश्नासंदर्भात ज्यामध्ये रेल्वे ब्रॉडगेज असो किंवा बाभळी बंधारा असो यासह विविध विषयांवरील सहजासहजी प्रश्न सुटले नसल्यामुळे तीव्र लढा देऊन आंदोलनच करावे लागले असून यावेळी बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न सुटला नाही तर पुन्हा तीच पाळी येणार असा सूर निघाला.
बाबळी बंधाऱ्याच्या वर बळेगाव बंधारा असून त्या बळेगाव बंधारा लाभक्षेत्रामध्ये कोलंबी उपसा जलसिंचन योजना लवकरच कार्यान्वित होण्याच्या दिशेने वाटचाल चालू झाली असून तब्बल आठ हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार असले तरी त्याचा लाभ फक्त नायगाव तालुक्यालाच होणार असून त्या धरतीवर बाभळी उपसा जलसिंचन योजना मंजूर करा या मागणीसाठी तीव्र आंदोलन होणार असल्याची संकेत दिसत.