नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यातील ता.धर्माबाद येथे नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्या विरोधात वीरशैव लिंगायत समाज व सकल हिंदू समाजाच्या वतीने धर्माबाद शहरात प्रथमच हजारोच्या संख्येने धर्माबाद शहरात भव्य असा मोर्चा काढून शहर कडकडीत बंद केले आणि या बंदला शहरातील व्यापारी वर्गाने दिवसभर दुकाने बंद करून बंदला उत्तम प्रतिसाद दिल्याचे निदर्शनात आले आमदार राजेश पवार यांच्या उपस्थितीत धर्माबाद येथे झालेल्या आमसभेच्या दिवशी मनसेच्या वतीने सार्वजनिक हिताची मागणी करण्याच्या उद्देशाने बॅनर प्रदर्शित केले होते अशा शुल्क कारणावरून भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षांनी मनसे शहराध्यक्ष सचिन रेड्डी चाकरोड व बॅनर प्रिंटिंग व्यवसाय करणारे हनुमंत कत्ते या या दोघांवर गुन्हे दाखल केले होते.
सदरील गुन्ह्याचा निषेध करून व खोटे गुन्हे मागे घ्यावेत म्हणून वीरशैव लिंगायत समाज आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने कायदेशीर मोर्चाचे व बंदचे निवेदन देऊन शहरात बंदची हक्क दिली व भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये परिसरातील सर्व लिंगायत बांधवांनी आणि हजारोच्या संख्येत तरुणांनी शांततेच्या मार्गाने मोर्चामध्ये सामील होऊन तानाशाही बंद करा आमदार राजेश पवार मुर्दाबाद च्या घोषणा देत धर्माबाद येथील मुख्य रस्त्याने मोर्चा काढण्यात आला एवढे मोठे कारण नसताना खोटे गुन्हे दाखल केले आहे ते गुन्हे वापस घ्यावे म्हणून धर्माबाद येथील 36 सामाजिक संघटनेने या बंदला व मोर्चाला लेखी पाठिंबा दिलेला आहे या अगोदरही लिंगायत समाजाच्या चार बांधवांवर खोटे गुन्हे दाखल केलेले यावेळी सांगण्यात आले आहे मोर्चाच्या माध्यमातून तहसील प्रशासनास निवेदन देऊन सर्वच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून आमदाराच्या कार्यप्रणालीला व भाजपा कार्यकर्त्यांच्या हुकूमशाही कृतीवर नाराजी व्यक्त केलेली आहे.
सदरील मोर्चा शांततेच्या मार्गाने महात्मा बसवेश्वर अण्णा हिल्स येथून राष्ट्रगीताने सुरुवात झाली धर्माबाद तालुक्याचे तहसीलदार व पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगाता करण्यात आली सदरील मोर्चात कसल्याही प्रकारे हिंसक वळण व अनुचित प्रकार घडू नये म्हणून धर्माबाद पोलीस प्रशासनाच्या वतीने भव्य बंदोबस्त लावण्यात आला होता लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात आला शहरातील व्यापाऱ्यांनी व सर्वच दुकानदारांनी मोर्चाला पाठिंबा व मोठा प्रतिसाद दिला आहे.