निराधार योजनेच्या ९९० लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर
दंडात्मक कारवाईतून १९५६४०० रुपयांचा महसूल शासन खात्यात जमा
नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव – तहसीलच्या महसूल, पुरवठा, निवडणूक, नैसर्गिक आपत्ती विभागासह संजय गांधी निराधार योजना ,श्रावण बाळ योजना, शेतकरी नैसर्गिक आपत्ती अशा विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नायगाव येथील तहसील चा फेब्रुवारी २०२४ रोजी पदभार घेतलेल्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड ह्या अल्पावधी काळातचं उत्कृष्ट तहसीलदार ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जनसामान्य नागरिकांतून कौतुक केल्या जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एच ओ एफ म्हणजे कुटुंब प्रमुख नसलेल्या व आधार कार्ड प्रमाणे नावे नसलेल्या व चुकीचे अडनाव असलेल्या शिधापत्रिका वर कार्यवाही केलेली आहे,आणि पात्र लाभार्थ्यांचे
दवाखानाचे कामासाठी व शासकीय कामाचे कोणतेही काम थांबू नये म्हणून अडचणीत असलेल्या सर्व लाभार्थ्यांना ऑनलाईन शिधापत्रिके नुसार नावे असल्यास लाभ देण्यात आलेला असून आधारकार्ड प्रमाणे नावेऑनलाईन शिधापत्रिकेत दुरुस्त केल्या शिवाय कोणताही लाभ मिळत नाही.त्यासाठी सर्वांनी कुटुंबातील सर्वांचे आधार कार्डसह फॉर्म देऊन ऑनलाईन करून घ्यावे.
नायगाव तालुक्यातील डिलीट झालेल्या शिधापत्रिकांची माहिती घेऊन एकूण ४३३ शिधापत्रिका होत्या
त्यापैकी ४५ शिधापत्रिका दुरुस्त केल्या
कमी झालेल्या शिधापत्रिका एकूण ३५५ होत्या त्यापैकी आधार कार्ड प्रमाणे नविन २०५ शिधापत्रिका करण्यात आलेल्या आहेत त्यांना पुडच्या महिन्यात धान्याचा लाभ मिळणार आहे तर कांही शिधापत्रिका मध्ये इतर राज्यात धान्य उचल असल्याचे निर्दशनास आले तसेच काही शिधापत्रिका धारक पेन्शन धारक उत्पनन जास्त असणारे अपात्र लाभार्थी आढळून आले.
शिधापत्रिका ऑपरेटर च्या लॉगिन आयडी वरुन डाटाइन्ट्री केलेल्या नाव दुरुस्ती, योजना बदल व नविन शिधापत्रिका एकुण ६०० तहसिलदार लॉगिनला जवळपास मागिल आठ महिन्यापासुन प्रलंबित होते. तहसीलदार गायकवाड याना दिनांक निहाय अप्रुव्हल दिल्या शिवाय पुढील अप्रुव्हल देता येत नव्हते. त्यामुळे जेवढ्या संचिका नियमानुसार आढळल्या त्यानुसार अप्रुव्हल देण्यात आले व उर्वरित संचिका परिपुर्ण नसल्यामुळे रिजेक्ट कराव्या लागल्या त्या कांही दिवसात दुरुस्त करणार असल्याची माहिती तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी दिली आहे.
तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी नायगाव तहसीलचा कारभार घेतल्या पासून तहसील हद्दीतील परिसरात
अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणात दंडात्मक केकेल्या कारवाईतून १९५६४०० ( एकोणीस लाख छेप्पन हजार चारशे रुपये) चा महसून शासन खाती जमा करण्याचे काम तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी केले असून शेतकरी नैसर्गिक आपत्ती ऑनलाइन करून शेतकऱ्यांना सोय उपलब्ध करून दिली आहे. तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचा व श्रावण बाळ योजनेच्या जवळपास ९९० लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करून निराधार लोकांना आधार देण्याचं पवित्र काम तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड
यांनी केले असल्याने अल्पावधी काळातच नायगाव तहसील च्या उत्कृष्ट तहसीलदार ठरल्या आहेत.
■ कोट =आधार कार्ड दाखल करावे.
- तालुक्यात उर्वरित शिल्लक राहिलेल्या कार्ड धारकांचे कुटुंब प्रमुखासह घरातील सर्वांचे आधार कार्ड तहसिल कार्यालयात जमा करण्यासाठी संबंधीत स्वस्थ रेशन दुकानदारांना लेखी कळविण्यात आले आहे. तरी कुटूंब प्रमुखाणीही रेशनकार्ड ची संचिका तयार करून तहसील कार्यालयात दाखल करावे तात्काळ ऑनलाइन करून निकाली काढल्या जाणार आहेत.