आगामी नायगाव विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग….

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

 

 यात भाजपाला गटबाजीचे ग्रहण तर काँग्रेस कडून कार्यकर्त्यांची जुळवाजवळ चालू….

 नांदेड प्रतिनिधी/ अशोक वाघमारे.

नांदेड – आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून नायगाव विधानसभा निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग यात नायगाव विधानसभा क्षेत्रातील अनेक नेते मंडळी यांनी स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी मोठ्या धडपडी चालू केले आहेत यात काही नेते पक्षाचे तिकटाचे अपेक्षा बाळगून राज्यातील नेतेमंडळींच्या गाठीभेटी चालू ठेवल्या तर काही नेते जनसामान्यसाठी विविध शिबिर,उपक्रम राबविण्यात मग्न झाले आहेत. आणि मतदारसंघातील जनतेला केंद्रबिंदू म्हणून विकास कामाचा धडाका चालू केले आहे त्यात विद्यमान आमदार यांनी विकास कामाच्या जोरावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न चालू केला असून मात्र काहींनी विद्यमान आमदार यांना डावळून व सदर विधानसभा सदस्यांचे खच्चीकरण करून आणि गटबाजी तयार करून विद्यमान आमदारांना चक्रव्हूव मध्ये अडकवण्याचा मोठा प्रयत्न केल्याचे मतदारसंघातील जनसामान्य मतदारांकडून प्रतिक्रिया येत आहेत. एकूण नायगाव विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे तीन ते चार गट असून यात तीन घटक संगणमत आणि काम करत असून मात्र विद्यमान आमदार यांना डावळून स्वतः कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. आणि जिल्ह्यातील भाजपा वरिष्ठ नेत्याकडे मतदारसंघात मोठी ताकद असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न चालू असल्याचे नागरिकाकडून सांगण्यात येत आहे.

       

सदर भाजपच्या गटबाजीमुळे भाजपला मोठा फटका बसण्याचे प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपच्या गटबाजीमुळे मागील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर याचे पडसाद उमटल्याने भाजप वरिष्ठ नेत्यांना आत्मपरीक्षणाची उणीव भासली आहे. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप मात्र बॅक फुटवर गेल्याचे सांगण्यात येत आहे. आणि जिल्ह्यामध्ये काँग्रेसला चांगल्या प्रकारे यश प्राप्त झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ चैतन्याचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील एकूण नऊ विधानसभा क्षेत्रातील नेते कार्यकर्ते यांनी मात्र जिल्ह्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडे स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याची मोठी धडपड करून कार्यक्रमाचा व शिबिर उपक्रमाचा सपाटा सुरू केला असून मतदार संघातील मतदारांच्या मत परिवर्तनामध्ये बदल करून आपलंसं करून घेण्यामध्ये मोठ्या चडावळी सुरू केले आहेत.

       

 यात जिल्ह्याला एकूण पाच खासदार मिळाले असून यामध्ये महाविकास आघाडीचे तीन व युतीचे दोन खासदार आहेत मात्र नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसचे विद्यमान खासदार असून ते मोठ्या मताधिकेने विजय झाले आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठे यश आगामी विधानसभेसाठी मिळेल या अपेक्षणी काँग्रेस कार्यकर्ते मात्र मोठ्या जमाने कामाला लागले आहेत. मागील काळामध्ये जिल्ह्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते नेते हे भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसची मोठी गळचेपी झाल्याचे दिसून येत होते मात्र मागील लोकसभा निवडणूक मध्ये महाराष्ट्र मध्ये वेगळीच निकाल लागल्याने काँग्रेसला मोठे आगामी विधानसभेमध्ये यश मिळेल या भावनेतून कार्यकर्ते स्वतःचं वर्चस्व निर्माण करत आहेत. आणि नांदेड लोकसभा गड काँग्रेस नेत्याला राखण्यात यश आले आहे. आगामी नायगाव विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला गटबाजीचे ग्रहण लागले असून नेमके कोणाला पक्षाने संधी देईल याची उत्सुकता मात्र मतदारसंघातील जनतेला असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून कार्यकर्त्याची जुळवाजवळ करून पक्षात संगणमत दाखवण्याचा प्रयत्न करत असून यात मात्र काँग्रेस पक्षाने कोणाला संधी देईल हा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे.

         

आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित पॅटर्न कोणाला साथ देईल व किती मताधिक्याची बाजी मारेल आणि यात मराठा समाजाचा फायदा कोणाला होईल आणि ओबीसी समाजाचा पाठिंबा कोणाला राहील यावरून मतदार संघाचे समीकरण असणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत जातीय समीकरण चा फटका बसणार की विकास कामाच्या मुद्द्यावर फायदा होणार हे मात्र आगामी काळामध्ये पाहायला मिळणार आहेत मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडी फॅक्टर कायम चालेल का व भाजप आत्मपरीक्षण करून मतदारसंघात काळजीपूर्वक विवो रचना तयार करून आपली जागा अबाधित राखेल का अशा प्रश्नांना मात्र सामान्य जनतेकडून वाचा फुटत आहे.

Share This Article
error: Content is protected !!