नायगाव तालुका प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नायगाव येथील प्रविण दिलीपराव चव्हाण यांनी सीए परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नवी दिल्ली येथे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सीए परिक्षेत नायगाव येथील प्रविण दिलीपराव चव्हाण यांनी घवघवीत यश संपादन केले असून प्रविण चव्हाण हे एका शेतकरी कुटूंबातील मुलगा असून त्यांना जेष्ठ सनदी लेखपाल प्रवीण सदाशिवराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे त्यांच्या या यशाबद्दल नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण,युवा नेते रविंद्र चव्हाण यासह अनेकांनी अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.