राजकीय नेराश्यातुन खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

सच्चे कार्यकर्ते नकीच तुमच्या वक्तव्याचा येणाऱ्या काळात उत्तर देतील खा.वसंतराव चव्हाण

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

*नांदेड – शोभा नगर येथील शंकरराव चव्हाण वातांनुकुलीत अभ्यासिकेचे उद्घाटन व लोकाअर्पण सोहळ्यानिमित्त ज्या काही घडामोडी घडल्या आणि घडविण्यात आल्या या योग्य नसून नेते म्हणून घेणाऱ्या यांच्या कर्तुत्वाला अशोभनीय आहे.

आगे बढो म्हणून नारेबाजी करून मोठे होता येत नाही ही प्रतिक्रिया त्यांनी नैराश्यातु देण्यात आली असावी अशी जळजळीत प्रतिक्रिया खासदार वसंतराव चव्हाण यांनी खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना प्रस्तुत प्रतिनिधी जवळ व्यक्त केली.
नांदेड शोभानगर येथील अभ्यासिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिका आणि त्याचे करण्यात आलेल्या नियोजनात खा.वसंतराव चव्हाण सह पक्षातील मान्यवरांना जाणून बुजून डावलण्याचे खालच्या पातळीचे राजकारण करण्यात आले.त्याच्या प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यात उमटणे साहजिकच होत्या त्या उमटल्या.
या कार्यक्रमाचे नियोजन करणारे महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकारी नांदेड यांना झालेल्या घडामोडी बद्दल निवेदने देण्यात आले.यानंतर घडलेल्या घडामोडी नंतर वेगळ्या निमंत्रण पत्रिका प्रकाशित करून सावरा सावरीचा प्रयत्नही करण्यात आला. यावेळेस संकुचित विचारसरणीचे राजकारण खालच्या पातळीवर जाऊन करण्यात येत असल्याचे नजरेस पडल्याने पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होणे साहजिक होते.

काही काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत व उत्साही कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या स्थळी आगे बढो हम तुम्हारे साथ है चे नारे देऊन घडलेल्या घटनेचा निषेध केला. या पूर्वीही ज्यांनी आगे बडोचा नारा देऊन विकास होत नाही.अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या आशोकरावांना आजपर्यंत काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी आगे बडोचे नारे देतच मोठे केले आहे.त्याच नाऱ्याच्या बळावर दोन वेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदाबरोबरच 30-35 वर्ष राज्यसत्ता उपभोगायला भेटली यांचा त्यांना आज विसर पडल्याचे दिसून आल्याची झहरी टीका खा.वसंतराव चव्हाण यांनी खा.अशोकराव चव्हाण यांच्यावर केली.
अभ्यासिका यांना जो निधी देण्यात आला तो शासनाचा निधी काँग्रेस राजवटीतील आहे.आजपर्यंत केलेली विकास कामे हे काँग्रेसच्याच राजवटीत करण्यात आलेली आहेत. कदाचित यांचाही विसर खा. अशोकराव चव्हाण यांनाआज झालेला दिसतो,ज्यांची आपेक्षा होती ते ही मान्यवर मंडळी आता सोबत नाहीत.त्यामुळे असे काहीतरी सुचत असावे असली खोचक प्रतिक्रिया खा. वसंतराव चव्हाण यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
राजकारण व विकासकामे करताना दोन पावले मागे दोन पावले पुढे जावे लागते .विकास हा सकारात्मक विचारसरणीतून झाला पाहिजे.तो करत असताना पक्ष कोणताही असो सर्वांना सोबत घेण्याचा मोठेपणा जोपासणे गरजेचे आहे.

मी म्हणेल तेच,मी ठरविले तीच धारणा करून घेणे योग्य नाही.कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली तेच कार्यकर्ते या पूर्वी तुमच्या साठी नारेबाजीच करत होते,यांचा त्यांना आज विसर पडलेला दिसतो.आगे बडो म्हनण्यात व आपणास मोठे करण्यात आमचाही आपणास सहभाग होताच याचा विसर कसा पडला ? हे विसरून चालणार नाही.

नांदेड जिल्ह्यात विकास कामे करतांना काँग्रेस पक्ष आपल्या सोबत होता त्यांचे तुम्ही पाईकच होतात हे विसरून चालणार नाही,जनता आपल्या झालेल्या घडामोडी विसरलेली नाहीत म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाला मोठा कौल दिलेला आहे.जनता पूर्वी काँग्रेस पक्षासोबत होती आजही आहे.हे कालच्या लोकसभा निवडणुकीवरून सिद्ध झाले आहे. आपण कुठे आहोत ? मीच म्हणजे आपण,आपण म्हणजेच पक्ष हा भ्रम आता सोडणे आवश्यक आहे.

या अभ्यासिकेच्या उद्घाटन सोहळ्यास कोण कोण उपस्थित होते व प्रशासनातील कोणते अधिकारी होते ? याचा ही कुठेतरी विचार करणे गरजेचे आहे.

Share This Article
error: Content is protected !!