नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवार 27 जुलै 2024 रोजी लोकअदालतीचे आयोजन केले आहे.
या लोकअदालत मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रलंबित प्रतिवेदन, ई-चालन यासंदर्भातील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी करण्यात येणार आहे.तरी वाहनचालक – मालक यांनी या लोकअदालतीत उपस्थित राहावे आणि तडजोड पध्दतीने आपल्या वाहनासंबंधी प्रकरणाचा निपटारा करावा. प्रलंबित प्रकरणे निपटारा करण्यासाठी वाहन चालक-मालक यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.